esakal | VIDEO : ..अन् नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त रुग्णही निघाला घरी!.टाळ्या वाजवत हिमतीला दिली दाद!
sakal

बोलून बातमी शोधा

2 nd corona free.jpg

 भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच नाशिकमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने इथेही धाकधूक वाढली. अशातच दिलासादायक बातमी घडली आहे. (ता.१४) एप्रिलला जिल्ह्यात आढळलेला पहिला कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. ​

VIDEO : ..अन् नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त रुग्णही निघाला घरी!.टाळ्या वाजवत हिमतीला दिली दाद!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 नाशिक :  भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच नाशिकमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने इथेही धाकधूक वाढली. अशातच दिलासादायक बातमी घडली आहे. (ता.१४) एप्रिलला जिल्ह्यात आढळलेला पहिला कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

 जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त ठरला नाशिकचा 'तो' रुग्ण.!

नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील संशयीत रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट  (ता.४) पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज (ता.१८) त्याच पॉझिटिव्ह  रुग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या रिपोर्टमुळे सगळ्यांनाच दिलासा मिळाला. त्यानंतर रुग्णाचा तिसरा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त रुग्ण ठरला आहे. सुमंगल सोसायटी, मनोहर नगर, गोविंदनगर परिसरात हा कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण 

जिल्ह्यातील प्रथम रुग्ण १४ एप्रिलला डिस्चार्ज

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा गेल्या 25 मार्चला जिल्ह्यातील पहिला रुग्ण पिंपळगाव नजीक (लासलगाव) येथील 35 वर्षीय तरुण निष्पन्न झाला. त्या वेळी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा हादरली. जिल्हा रुग्णालयात 14 दिवसांच्या उपचारानंतर हा तरुण जिल्ह्यातील पहिला कोरोनामुक्त रुग्ण ठरला. जिल्हा रुग्णालयाचे डॉक्‍टर आणि त्यांच्या टीमने दिलेल्या मानसिक आधारामुळेच या जीवघेण्या कोरोनावर मात करणे शक्‍य झाले. माझ्यासाठी तेच परमेश्‍वरच असल्याची भावना या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली होती . जिल्ह्यात आढळलेला पहिला कोरोना रुग्ण आता कोरोनामुक्त झाल्याने त्याला मंगळवार (ता.१४) जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णाने डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच सर्वांनी त्याचे टाळ्या वाजवत त्याच्या हिमतीला दाद दिली

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!

पालकमंत्र्याच्या निवासस्थानाचा परिसरही केला होता सील

 नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानापासून एक दीड किलोमीटर अंतरावर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. यानंतर मनोहर नगर, गोविंदनगरपासून तीन किमी परिसर सील करण्यात आला होता.  त्यावेळी महापालिका आयुक्तांनी या परिसराला भेट दिली होती. मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारीही सोमवारी (ता.६) उपस्थित होते. या परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

loading image
go to top