
E Challan : पावणेतीन लाख बेशिस्त वाहनचालकांकडे दंड Pending!
नाशिक : विनाहेल्मेटसह वाहतूक (Transportation) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून ई- चलनाद्वारे (Echallan) ऑनलाइन दंड ठोठावण्यात येता.
ई- चलनाच्या माध्यमातून दंड ठोठावलेल्या शहरातील सुमारे पावणेतीन लाख वाहनचालकांनी त्यांच्याकडील दंडच भरलेला नाही. (Around 53 lakh motorists in city who have been fined through echallan have not paid fines Nashik news)
यामुळे वाहतूक पोलिसांसमोर थकलेला दंड वसुलीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दंड वसुल करण्यासाठी शहरातील सुमारे दीड लाख बेशिस्त वाहनचालकांना दंड वसुलीसाठीच्या नोटिसा बजाविण्यात आल्या असून, त्यांना शनिवारी (ता. ११) राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये हजर राहण्याचे आदेशही बजावले आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. पूर्वी जागेवर पावती देत दंड वसुल केला जात होता. मात्र त्यातून अनेक वादावादीसह पोलिसांच्याच पावतीवर शंका घेतल्या जात असतं. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ई- चलनाद्वारे दंड आकारण्याचा फंडा वापरला जातो.
वाहतूक पोलिस बेशिस्त वाहनचालकाचा फोटो काढून त्यावर ई- चलनाद्वारे ऑनलाइन दंड केला जातो. बऱ्याचदा वाहनचालक जागेवर दंडाची रक्कम देत नाहीत. त्यामुळे सदर दंड त्यांच्या नावावर ऑनलाइन जमा होता. परंतु, वाहनचालक सदर दंडच भरत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे नाशिक शहरात तब्बल २ लाख ७० हजार बेशिस्त वाहनचालकांकडे ई- चलनाद्वारे करण्यात आलेल्या दंडाची रक्कम थकीत आहे.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
सदरील ई- चलनाद्वारे करण्यात आलेल्या दंडाची रक्कम वसुल करण्याचा मोठा प्रश्न वाहतूक पोलिस शाखेसमोर उभा राहिला आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून राष्ट्रीय लोकशाही अदालतीचा आधार दंड वसुलीसाठी घेतला जातो.
त्यानुसार, शहरातील थकीत दंड असलेल्या सुमारे १ लाख ४३ हजार बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी दंड भरण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्यासाठी या बेशिस्त वाहनाचालकांना शनिवारी (ता. ११) होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश बजाविले आहेत.
थकबाकीदार उदासीन
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी (ता. ११) जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. प्रत्येक लोकअदालतीत लाखो रुपयांच्या दंड वसुलीसाठी वाहतूक विभागातर्फे प्रयत्न केले जातात.
परंतु, त्याकडे थकबाकीदार वाहनचालक उदासीन असल्याचेच दिसून आलेले आहे. त्यामुळे आता थकीत दंड असलेल्या सर्व वाहनचालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. वाहनचालकांना न्यायालयात हजर राहून दंड भरणे अनिवार्य असेल. अन्यथा, पुढील लोकअदालतीपर्यंत पुन्हा दंडाबाबत नोटीस येण्याची शक्यता आहे.