AYUSH Course Admission : आयुष अभ्यासक्रम प्रवेशाची मंगळवारपर्यंत मुदत; दुसरी यादी जाहीर

education Medical admission
education Medical admission esakal

AYUSH Course Admission : आयुष अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध झाली आहे. राज्‍यस्तरावर २३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा यादीत समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी मंगळवार (ता. १०)पर्यंत मुदत असणार आहे. (AYUSH syllabus admission deadline till 10 oct nashik news)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांची प्रक्रिया पूर्णत्वास आलेली आहे. दुसरीकडे आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस) यांसह फिजिओथेरेपी व अन्‍य अशा सर्व आयुष अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची दुसरी फेरी सध्या सुरू आहे.

याअंतर्गत निवड यादीची घोषणा गुरुवारी (ता. ५) करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्‍या महाविद्यालयांकरिता ही निवड करण्यात आली आहे.

education Medical admission
Dental Medical College : आरोग्य विद्यापीठाकडून त्या महाविद्यालयांना संलग्‍नता; दंत वैद्यकीयच्या हजार जागांची संधी

मंगळवार (ता. १०) पर्यंत विद्यार्थ्यांना निवड झालेल्‍या महाविद्यालयात जाऊन प्रत्‍यक्षात प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

तिसऱ्या फेरीसाठी २० पासून नोंदणी

प्रक्रियेच्‍या पुढील टप्प्‍यात तिसऱ्या प्रवेश फेरीच्‍या नोंदणीची प्रक्रिया २० ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. ऑनलाइन नोंदणी व तिसऱ्या फेरीसाठी नोंदणीची मुदत २० व २१ ऑक्‍टोबर अशी असेल. २२ ऑक्‍टोबरपर्यंत शुल्‍क भरण्याची मुदत असेल.

सर्वसाधारण गुणवत्तायादी २३ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध होईल. त्‍याआधारे विद्यार्थ्यांना ऑप्‍शन फॉर्म भरण्याची मुदत २३ व २४ ऑक्‍टोबर अशी असेल. २६ ला निवड यादी जाहीर केली जाणार असून, २७ ते ३० ऑक्‍टोबरदरम्‍यान प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.

education Medical admission
Medical Facilities: सरकारी वैद्यकीय सुविधा आता निःशुल्क! सर्व शासकीय रुग्णालयांत उद्यापासून अंमलबजावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com