Sant Nivruttinath Yatrotsav : द्राक्षनगरीत हरिनामाच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमला; शहर भक्तिरसात चिंब

चांदवड, मालेगावसह कसमादेतून त्र्यंबकेश्‍वरकडे जात असलेल्या दिंड्यांनी पिंपळगाव शहर भक्तिरसात ओले चिंब झाले आहे.
Departure of Sant Nivritti Palkhi at Trimbakeshwar along with Varkari carrying flag in hand.
Departure of Sant Nivritti Palkhi at Trimbakeshwar along with Varkari carrying flag in hand.esakal

Sant Nivruttinath Yatrotsav : चांदवड, मालेगावसह कसमादेतून त्र्यंबकेश्‍वरकडे जात असलेल्या दिंड्यांनी पिंपळगाव शहर भक्तिरसात ओले चिंब झाले आहे. निवृत्तीनाथ महाराज की जय...विठ्ठल विठ्ठल जय हरीच्या नामघोषाने द्राक्षनगरीचा आसमंत दुमदुमला.

त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने निघालेल्या दिंड्या पिंपळगावला नियोजित ठिकाणी मुक्कामाला थांबल्या. (city is drenched in bhakti ras by Bindas going to Trimbakeshwar for Nivruttinath Maharaj Yatrotsav nashik news)

नंतर भजन,कीर्तन,टाळ-मृदुंग,भगवे ध्वज यामुळे शहरातील उपनगरे,महामार्ग परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. मुक्काम करून दिंड्या निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या.

पिंपळगावला गेली दोन दिवस विठ्ठल नामाच्या भक्तिरसात बुडाले. कसमादे परिसरातून परंपरे प्रमाणे दिंड्या पिंपळगाव शहरात गुरुवार व शुक्रवारी मुक्कामासाठी थांबल्या. यावेळी दिंडीत सहभागी झालेल्या नागरिकांकडून वारकऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

यावेळी भजन, कीर्तनामुळे परिसरात निवृत्तीनाथ महाराजांच्या भक्तिभावाने भारावून निघाला. रिंगण सोहळ्यामुळे हा उत्साह अधिकच शिगेला पोचला. नियोजित ठिकाणी सडारांगोळी काढून दिंड्यांचे स्वागत करण्यात आले.

उपसरपंच विनायक खोडे, बापूसाहेब पाटील, अजित कुशारे, समर्थ औद्योगिक वसाहतीचे संचालक सुधाकर मेंगाणे, अभिजित बुरकुले, दिलीप दिघे, आरोग्य सहाय्यक नीलेश माठा, बालाजी मंदिर भक्त परिवार यांच्याकडून दिंड्याच्या मुक्कामांची व्यवस्था करण्यात आली. अश्‍विनी लॅबच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.

Departure of Sant Nivritti Palkhi at Trimbakeshwar along with Varkari carrying flag in hand.
Sant Nivruttinath Yatrotsav : तूंचि चराचरीं दिससी आम्हां!! काल्याच्या कीर्तनानंतर वारकऱ्यांचे प्रस्थान

भाविकांची गर्दी

पिंपळगाव येथे दिंड्यांनी मुक्काम ठोकल्यानंतर आयोजकांकडून देवाची पालखी, वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले. यावेळी अश्‍वाच्या सोबतीने होत असलेला नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

टाळ, मृदुंगाच्या ठेक्यात अन निवृत्तीनाथ महाराजांच्या जयघोषात पडत असलेले पदन्या, फुलांची उधळण या भारावन टाकणाऱ्या वातावरणात भगव्या पताका धारण केलेल्या वारकऱ्यांची पावले त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने निघाली. जय माऊली म्हणत वारकऱ्यांनी पिंपळगावकरांचा निरोप घेतला

सिन्नर तालुक्यातून त्र्यंबकेश्वरकडे रवाना

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया, 'विठ्ठलाच्या पायी नीट झालो भाग्यवंत' अशा असंख्य अभंगांनी सिन्नरचे सर्व रस्ते ज्ञानोबा माऊली तुकाराम, संत निवृत्ती महाराज की जय आशा जयघोषनी दुमदुमून गेली. निमित्त होते, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्याचे. सिन्नर शहरात अनेक संत निवृत्तीनाथ पालख्यांचे स्वागत शहरवासीयांनी वाजत

गाजत केले. तसेच सडा रांगोळी व विविध कीर्तनाद्वारे वारीचा महिमा वारकऱ्यांनी या पालखी सोहळ्यात सांगितला.'गळ्यात तुळशीमाळा, डोईवर तुळशी वृंदावन, हाती वीणा, मुखात हरिनाम' अशा भक्तीमय वातावरणात संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सिन्नर तालुक्यातून त्रंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी प्रस्थान झाले.

सावरगाव दिंडीतील वारकऱ्यांचा शनिवारी सत्कार करताना अजित कुशारे.
सावरगाव दिंडीतील वारकऱ्यांचा शनिवारी सत्कार करताना अजित कुशारे.esakal
Departure of Sant Nivritti Palkhi at Trimbakeshwar along with Varkari carrying flag in hand.
Sant Nivruttinath Yatrotsav : वारकऱ्यांच्या सेवेसाठी दीडशे बसगाड्या सेवेत!

नांदगाव बुद्रूकला दिंडीचे स्वागत

इगतपुरी : त्रंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त वारकऱ्यांना सदैव दर्शनाची आस लागलेली आहे. वारकरी संप्रदयाची पताका खांद्यावर घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करीत अनेक पायी दिंड्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातून देहभान हरपून त्र्यंबकेश्वरकडे मार्गक्रमण करताना दिसत आहे.

नांदगाव बुद्रूक (ता. इगतपुरी) येथे औंधेवाडी येथील पायी दिंडीचे गायकर परिवाराने जोरदार स्वागत केले. नांदगाव येथील कै.यशवंत सावळीराम गायकर आणि आजी देऊबाई यांच्या स्मरणार्थ सुभाष दशरथ यशवंत गायकर हे गेल्या पाच वर्षांपासून अन्नदानाची सेवा करतात. ही दिंडी येथे मुक्कामी असते.

यावेळी पहाटे काकडा भजन रात्री हरिपाठ,कीर्तन आदी कार्यक्रम झाले.या दिंडीचे १३ वे वर्षे असून मधुकर महाराज कुंदे यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी दिंडी जाते. यात विणेकरी किसन महाराज कुंदे, चोपदार अशोक कुंदे, किसन कुंदे, रावजी कुंदे असा १४० वारकऱ्यांचा सहभाग आहे.

Departure of Sant Nivritti Palkhi at Trimbakeshwar along with Varkari carrying flag in hand.
Sant Nivruttinath Palkhi : जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता..! 17 दिवसांचा परतीचा प्रवास

याप्रसंगी ऋषाली गायकर, पखवाज वादक रोहित गायकर, राजाराम गायकर, जगन गायकर, बबन गायकर, विजू गायकर,जयराम गायकर नामदेव गायकर, परशराम गायकर, शांताराम गायकर, सुभाष गायकर, हिरामण गायकर, कांतिलाल गायकर, रवी गायकर, सागर गायकर, प्रशांत गायकर, तेजस्विनी गायकर आदी उपस्थित होते.

''भाव-भक्ती गीतामधून वारकरी परमेश्‍वराच्या चरणीलीन होतात. पिंपळगाव शहरातील नागरिक मोठ्या आदराने या दिंडीचे आदरातिथ्य करून भजन सोहळ्याचे आयोजन करातात. धकाधकीच्या जीवनातील हे चित्र संस्कृती जपणारे ठरते.''- भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत

''वारकऱ्यांच्या सेवेचा आनंद अवणीय असतो. दरवर्षीची परंपरा यंदाही कायम राहिली. वारकऱ्यांचा एक दिवसाचा मुक्कामातील भावभक्ती गीते,भजन, कीर्तनाने वर्षभर कामाला ऊर्जा देऊन जातो. त्यांची सेवा करण्यास मिळणे हे भाग्य आहे.''- अजित कुशारे, संचालक,अश्‍विनी लॅब).

Departure of Sant Nivritti Palkhi at Trimbakeshwar along with Varkari carrying flag in hand.
Sant Nivruttinath Palkhi : अवघ्या जनालागी केला नमस्कार, उठावले भार वैष्णवांचे! पारणे फेडणारा सोहळा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com