Nashik Cotton Rate : भाव घसरणीमुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत

Cotton Prices Decrease
Cotton Prices Decreaseesakal

बाणगाव बुद्रूक : कापूस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नगदी पीक. यावर्षी कापसाला मुहूर्तावर निघालेला १० ते १२ हजारांचा भाव तसेच मागीलवर्षी मिळालेल्या १२ ते १३ हजारांच्या भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा लागली असतानाच डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेतील घडामोडीमुळे कापसाच्या दरात सुमारे तीन ते साडेतीन हजारांची घट झाल्याने उत्पादन शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरात मोठी घट झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी पांढरं सोनं घरात साठवून ठेवले. (Cotton farmers are worried due to falling prices Nashik News)

Cotton Prices Decrease
Nashik News : लेखा विभागाचे हात दाखवून अवलक्षण

या वर्षी कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे कापसाला प्रतिक्विंटल १० ते १२ हजारांपर्यंत भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापूस पिकासाठी लागणारा खर्च व सध्या मिळणारा ८ हजारांचा भाव या दोन्ही बाबी पाहता शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नसल्याची चर्चा आहे. कापसाला कमीत कमी १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळावा,अशी अपेक्षा बळिराजा व्यक्त करत आहे.

मात्र सध्या बाजारात कापसाला ८ हजार ५०० ते ८०० पर्यंत भाव दिला जात आहे. पुढील काही दिवसात कापसाला पुन्हा दहा हजारांपुढे भाव मिळेल. या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे.

नाशिक जिल्हासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. सुरवातीला व्यापाऱ्यांनी जादा भावाचे गाजर दाखविले. मात्र कपाशीला चांगला भावच अजून मिळाला नाही. कधी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० तर कधी ९ हजार ५०० असाच सध्याचा भाव मिळत आहे.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Cotton Prices Decrease
Crime News : मोबाईल, मंगळसुत्र, दुचाकीची घ्या काळजी...

गरजेपुरतीच कापसाची केली जाते विक्री

सुरवातीला आलेला ओला कापूस शेतकऱ्यांनी वजन वाढत असल्याने विकला. त्यावेळी भाव देखील दहा हजारच्या जवळपास होते. तर काहींनी मुहूर्तावर जमलेला कापूस देत चांगला भाव घेतला. यानंतर कापूस ८ हजार २०० वर येऊन ठेपला. पुन्हा त्यात वाढ होत भाव ८ हजार ५०० पर्यंत पोचला. मात्र दहा ते बारा हजारच्या भावाची अपेक्षा असल्याने कापूस घरात भरला आहे. त्यामुळे जेवढी गरज, तेवढाच कापूस विकण्यात येत आहे.

Cotton Prices Decrease
Nashik News : चंदनपुरी यात्रेत ढोलकीची जादू ओसरली; Electronic खेळणीच्या मागणीने विक्रीवर परिणाम

"हमखास उत्पन्न देणारे एकमेव पीक म्हणून आम्ही कपाशीची लागवड करतो. पण दिवसेंदिवस कापूस पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत बियाणे औषधे, मजुरी याचा प्रचंड प्रमाणात खर्च येत आहे. हा खर्च वाढतच आहे. त्याच पर्जन्यमान कमी जास्त असते, बेमोसमी पाऊस यामुळे कापूस पिकाचे उत्पादन घटते. कापसाला जर १० हजारच्या वर भाव गेला तर आम्हाला चांगले पैसे मिळतील."

- देविदास घोडके, प्रगतिशील शेतकरी

"या वर्षी सुरवातीला कापसाला दहा हजारच्या भाव मिळाला. पण हा भाव टिकला नाही. काही दिवसात भाव कोसळले. कापूस विक्रीसाठी आला तर भाव कमी होतात. विक्री थांबली तर भाव वाढतात. साधारण एप्रिलमध्ये कापसाला चांगला भाव मिळू शकतो. पण तोपर्यत थोड्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्री साठी असेल.."

- अतूल कवडे, कापूस खरेदीदार व्यापारी, बाणगाव

Cotton Prices Decrease
Nashik News : जुन्या मूर्तीचे विसर्जन, नवीन मूर्तीची स्थापना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com