Nashik News : महापालिकेत 1 जूनपासून आपत्ती निवारण कक्ष

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Malegaon Municipal Corporation latest marathi newsesakal

Nashik News : महापालिका प्रशासन आगामी पावसाळ्याच्या पाश्‍र्वभूमीवर सज्ज झाले आहे. आरोग्य व स्वच्छता विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. (Disaster Prevention Room in Municipal Corporation from June 1 malegaon nashik news)

पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, गटार सफाई व खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. तसेच महापालिकेत एक जूनपासून आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे.

पावसाळा लक्षात घेता शहरातील धोकादायक इमारतींचे यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात एकूण १९२ इमारती धोकादायक आहेत. संबंधित इमारतींचे मालक व मालमत्ताधारकांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. या इमारतीत १५ इमारती अतिधोकादायक आहेत. १४४ इमारती राहण्यायोग्य नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Malegaon Municipal Corporation latest marathi news
NAFED Onion Purchase : नाफेडतर्फे होणार 3 लाख क्विंटल कांदा खरेदी : डॉ. भारती पवार

येथे वास्तव करणे जोखमीचे ठरणार आहे. ३० इमारतींना मनपा नगर विकास विभागाने धोकादायक ठरविले आहे. पावसाळ्याच्या पाश्‍र्वभूमीवर विभाग प्रमुखांची बैठक यापूर्वीच पार पडली आहे. नव्याने झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन काळातील उपाययोजना राबविण्याचे व दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील पूररेषेतील झोपडपट्टीधारकांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. आपत्ती निवारण उपाययोजनांबाबत ३१ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिले आहेत.

शहरातील मोसम नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण व पूररेषेत काही झोपडपट्ट्या आहेत. किल्ला झोपडपट्टी, अचानक नगर यासह नदीकाठी असलेल्या काही झोपड्यांमध्ये मोसम नदीला पुर आल्यास पाणी शिरते.

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Water Scarcity : इगतपुरी तालुक्यात गढूळ पाणीपुरवठा; भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com