दहावीच्या निकालात इंटरमिजिएटसाठी श्रेणी; मिळणार अतिरिक्त गुण

10th exam
10th examesakal

नाशिक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस २०२०-२१ मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ड्राॅइंग परीक्षा उत्तीर्ण केली आहे, पण त्यांना कोरोनामुळे इंटरमिजिएट ड्राॅइंग परीक्षा देता आली नाही. त्यामुळे दहावीच्या निकालात आता एंटरमिजिएट परीक्षेतील श्रेणी विद्यार्थ्यांना इंटरमिजिएटसाठी मिळणार आहे. त्याच्या आधारे दहावीत अतिरिक्त गुणांची सवलत दिली जाणार आहे. (extra-marks-in-10th-result-nashik-marathi-news)

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बुधवारी (ता.१६) निर्णय घेतला. कोरोनामुळे गेल्या वर्षी राज्यातील सरकारी रेखाकला परीक्षा घेतलेल्या नाहीत. शिवाय कोरोना काळातील आरोग्याच्या विचार करता, या परीक्षा घेऊ नयेत, असे सरकारने पुन्हा स्पष्ट केले आहे. शिवाय कला शिक्षण प्रशिक्षण पदविका (एटीडी) आणि मूलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन) या दोन अभ्यासक्रमांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सूट दिली आहे. ही सूट २०२०-२१ साठीच राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

10th exam
अन् तरुणाने बांधल्या 'किन्नर'शी रेशीमगाठी! एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा
10th exam
'नकोशी'ला बेवारसपणे फेकणारी माता अखेर पोलीसांच्या ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com