किसान संघर्ष संवाद यात्रेद्वारे शेतकऱ्यांची नाशिकहून दिल्लीकडे कूच; चांदवड घाटातून जाणारा शेतकऱ्यांच्या वाहनांचा जत्था

shetkari nashik.jpg
shetkari nashik.jpg

नाशिक : दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या हजारो शेतकऱ्यांना प्रवासातील पहिल्याचं रात्री कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. चांदवडच्या गुंजाळ शाळेच्या आवारात, मोकळ्या मैदानात जागा मिळेल तिथे या सर्व शेतकऱ्यांनी आपली रात्र काढली. कितीही संकटांचा सामना करावा लागला तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आरपारच्या लढाईचा निर्धार करून हे सर्व शेतकरी दिल्लीवर धडक देण्यासाठी निघालेत. 

शेतकऱ्यांचा वाहन मोर्चा दिल्लीकडे निघाला

मुंबई-आग्रा महामार्गावरुन शेकडो वाहनांद्वारे शेतकरी दिल्लीकडे निघाले.केंद्र सरकारने पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून सोमवारी (ता.२१) नाशिकहून शेकडो वाहनांद्वारे हजारो शेतकऱ्यांनी किसान संघर्ष संवाद यात्रेद्वारे दिल्लीकडे कूच केली. तत्पूर्वी राज्यभरातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या घोषणांनी गोल्फ क्लब मैदानासह परिसर दणाणून गेला होता. 

चांदवडहून शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने संसदेत पारित केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांबाबत शेतकऱ्यांत प्रचंड रोष आहे. त्याविरोधात पंजाब, हरियानासह परिसरातील लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या विविध सीमांवर लढा सुरू ठेवला आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय किसान सभेने पाठिंबा दिला असून, राज्यभरातील शेतकऱ्यांची मोट बांधत सोमवारी सायंकाळी नाशिकहून दिल्लीकडे प्रयाण केले. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून महाराष्ट्रातील हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले.

बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीकडे

सुमारे बाराशे किलोमीटरचा प्रवास करून २४ डिसेंबरला ते दिल्लीच्या सीमेवर पोचतील. विशेष म्हणजे दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा आपले राशन-पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीकडे निघाले आहेत. मोर्चाचा आजचा मुक्काम चांदवड येथे, तर मंगळवारी (ता. २३) धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जाहीर सभा व मुक्काम असेल. 

आंदोलनकर्त्यांच्या घोषणा- 
* किसान एकता जिंदाबाद 
* नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी 
* काळे कायदे मागे घ्या 
* मोदी सरकार होश में आवो 
* मोदी सरकार हाय हाय 
 
सहभागी पक्ष व संघटना 

माकप, भाकप, काँग्रेस, राष्ट्र सेवा दल, जनवादी महिला संघटना, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मुस्लिम उत्कर्ष समिती, आम आदमी पक्ष. 

सहभागी नेते 
किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, शेकापचे आमदार जयंत पाटील, ‘सीटू’चे राज्य सचिव आमदार विनोद नकोले, माजी राज्याध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावित, राज्याध्यक्ष किसन गुजर, माजी आमदार नरसय्या आडम, ‘सीटू’चे राज्य उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, विश्‍वास उटगी, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य सहसचिव सुनील मालुसरे, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, राजू देसले. 
 

केंद्र सरकारने आम्हाला अतिरेकी, नक्षलवादी ठरविले आहे. दुसरीकडे पुण्यात बाँबस्फोट घडवून शेकडो निरपराधांच्या जिवावर उठलेल्यांना थेट खासदारकीचे बक्षीस दिले जात आहे. रक्ताची, मुडद्यांची शेती करणारेच आज शेतकऱ्यांना न्याय द्यायला निघाले आहेत. -डॉ. अजित नवले  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com