भाजपशासित राज्यात महिलांवर अत्याचार : माजी आमदार दीपिका चव्हाण

Deepika Chavan & Chitra wagh
Deepika Chavan & Chitra waghesakal

सटाणा (जि. नाशिक) : देशातील भाजपशासित राज्यात महिलांवर अत्याचार सुरू आहेत. फडणवीसांच्या काळात गँगरेप व खुनाच्या ४७ घटना घडल्याने २०१९ मध्ये महिला अत्याचारात महाराष्ट्राचा दुर्दैवाने देशात पहिला क्रमांक आला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण राबवून त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपच्या चित्रा वाघ यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे नेहमी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची खरमरीत टीका राज्य महिला आयोगाच्या सदस्या व बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी केली आहे.

Deepika Chavan & Chitra wagh
भाजपचे माजी आमदार NCP च्या गळाला; पवारांच्या उपस्थित होणार प्रवेश

नाशिक दौऱ्‍यावर आलेल्या भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषदेत महिला अत्याचारासंदर्भात महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १५) थेट उत्तर दिले. त्या म्हणाल्या, उत्तरप्रदेश (Uttar Pradesh), आसाम (Assam), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), हरयाणा (Haryana) व कर्नाटक (Karnataka) या भाजपशासित राज्यात गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस (Hatharas) येथील मानवतेला काळीमा फासणाऱ्‍या घटनेच्या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न योगी सरकारने केला.

Deepika Chavan & Chitra wagh
तुम्हाला भाजप चालतो, तर आम्हालाही चालतो; काँग्रेसचा NCP आमदाराला विरोध

२०१६ मधील कोपर्डीच्या घटनेनंतर तत्कालीन फडणवीस (Devendra Fadanavis) सरकारला धारेवर धरणाऱ्या सुप्रियाताईंमुळेच आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली. फडणवीस सरकारच्या काळात २०१५ साली ३१ हजार ०१६ घटना, २०१६ साली ३१ हजार ३८८, २०१७ साली ३१ हजार ९७८, २०१८ साली ३५ हजार ४९७, तर २०१९ साली ३७ हजार १४४ महिलांवर अत्याचार झाले. फडणवीस सरकार हे महिलांसाठी कर्दनकाळ ठरले होते. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर २०२० पासून महिला अत्याचार, सामूहिक बलात्कार व खुनाच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.

महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com