Tanuja Gholap Bhoir Joins BJP
Tanuja Gholap Bhoir Joins BJPesakal

BJP News : शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप- भोईर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

नाशिक : देवळाली मतदारसंघावर तीस वर्षे आमदार म्हणून सेवा बजावणारे शिवसेनेचे माजी समाज कल्याण मंत्री नेते आणि उपनेते बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप भोईर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे देवळाली मतदार संघात चर्चेचा विषय झाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नामदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देवळाली मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून एससी साठी आरक्षित मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील वर्ष सलग कुटुंबाचे वर्चस्व होते. गेल्या निवडणुकीत आमदार सरोज अहिरे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला प्रतिनिधित्व मिळाले.

येणारे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप भोईर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे देवळाली मतदार घाची गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Tanuja Gholap Bhoir Joins BJP
Maharashtra Politics: राष्ट्रवादीमधून आऊटगोइंग सुरूच! माजी मंत्र्यांची कन्या भाजपमध्ये जाणार

देवळाली मतदारसंघात इच्छुकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये प्रीतम आढाव, राजश्री आहेरराव, विद्यमान आमदार सरोज आहिरे यांच्यासह तनुजा घोलप या इच्छुक आहेत. त्यामुळे येणारा काळ शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहणार की पुन्हा जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

"प्रवेशाची अजून मला कल्पना नाही. मी माहिती घेऊन प्रतिक्रिया देणे उचित ठरेल. दोन दिवस दिल्लीत होतो, त्यामुळे मला आजच बातमी समजली."

- बबनराव घोलप, माजी मंत्री, तनुजा घोलप यांचे वडील

Tanuja Gholap Bhoir Joins BJP
BJP Politics : 'जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत राहुल गांधी कधीच पंतप्रधान होणार नाहीत'; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com