Friendship Day 2023 : फ्रेंडशिप बँडला तरुण-तरुणीकडून पसंती; यंदा गिफ्ट घेण्याकडे कल

Friendship Day News
Friendship Day NewsSakal

Friendship Day 2023 : ऑगस्टच्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशिप डे रविवारी (ता. ६) ऑगस्टला आहे.

फ्रेंडशिप डेच्या पूर्वसंध्येला दिवसभर फ्रेंडशिप बँडसह विविध वस्तू खरेदीसाठी शहरातील विविध भागातील दुकानांसमोर लावलेल्या स्टॉलवर गर्दी झाली. (friendship day 2023 nashik news)

शाळा, महाविद्यालयामध्ये एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून फ्रेंडशिप डे हा शनिवारी (ता. ५) साजरा करण्यात आला. फ्रेंडशिप डे निमित्त तरुण-तरुणींनी फ्रेंडशिप बँडसह किचन, ब्रेसलेट, चेन आदी वस्तू खरेदीसाठी पसंती दिली. तसेच, महाविद्यालयीन तरुणांकडून वॉच, फ्रेंडशिप रिंग, परफ्यूम, वॉलेट आदी वस्तूंना मागणी होती.

शाळा महाविद्यालयातील मित्र- मैत्रिणींनी यासाठी शनिवारीच वेगळे नियोजन केल्याचे दिसले तर काही रविवारी भेटून फ्रेंडशिप डे साजरा करणार आहेत. शहर परिसरात पावसाळी पर्यटन करत निसर्गाच्या सानिध्यात मैत्री फुलविण्याचे नियोजन तरुणांकडून सुरू असल्याचे दिसते.

"तरुणांमध्ये गत तीन वर्षांपेक्षा यंदा उत्साह आहे. तरुण-तरुणीकडून विविध गिफ्ट घेण्याकडे कल वाढला आहे. फ्रेंडशिप बँडसह चॉकलेटला सर्वाधिक पसंती आहे." -रमेश दरियाणी, व्यावसायिक
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Friendship Day News
friendship day: ..तर समजा तुम्ही बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडलात

भन्नाट गिफ्टचा ट्रेंड

गिफ्ट दुकानांसमोर फ्रेंडशिप डेनिमित्त शहरातील विविध भागामधील दुकानांसमोरील स्टॉलवर विविध भन्नाट वस्तू घेताना तरुणाई दिसली. गत काही वर्षांमध्ये मित्र-मैत्रिणींना भन्नाट गिफ्ट देण्याचा ट्रेंड यंदाही कायम आहे.

फ्रेंडशीपच्या शो-पिसपासून चॉकलेट्‍स, विविध प्रकारचे ब्रेसलेट, चेन, किचन, बँड खरेदीसाठी तरुणाईची गर्दी होताना दिसली. फ्रेंडशिप बँड पाच पासून ते ७० रुपयांपर्यंत आहे. किचन तीस ते ११० रुपयांपर्यंत आहे. ब्रेसलेट व चेन ४० रुपयांपासून १३० रुपयांपर्यंत आहे.

"फ्रेंडशिप डे’निमित्त तरुणाईचा उत्साह शिगेला पोचला आहे. महाविद्यालयीन तरुणांची सर्वाधिक गर्दी दुकानात आहे. गतवर्षाच्या तुलनेत चांगला प्रतिसाद असून तरुणांकडून नवीन ट्रेंड फॉलो केले जात आहे" - महेंद्र चौधरी, व्यावसायिक

Friendship Day News
Friendship Day ला मित्रांना या 10 भारतीय भाषांमध्ये करा Wish

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com