lucky draw fraud
sakal
नाशिक: ‘आपण कूपन भरून दिले होते. लकी ड्रॉत आपले कूपन निवडले असून, भेटवस्तू घेण्यासाठी आपण जोडीने येणे बंधनकारक आहे...’ असा फोन येतो. चांगली भेटवस्तू असेल, असेही सांगितले जाते. मात्र असे फोन कॉल आल्यास अशा आमिषाला भुरळून न जाता स्वत:ची आर्थिक फसवणूक टाळता येऊ शकते. गेल्याच आठवड्यात अशाच काही दांपत्यांना संशयितांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.