Nashik Fire Accident : अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामांना भीषण आग

Godowns in Ambad Industrial Estate caught fire nashik fire accident news
Godowns in Ambad Industrial Estate caught fire nashik fire accident newsesakal

Nashik Fire Accident : अंबड औद्योगिक वसाहतीत चुंचाळे दत्तनगर परिसरातील आनंद वाटिकेच्या शेजारीच असलेल्या सात ते आठ लाकडी तसेच काही भंगाराच्या गोदामाला बुधवार दिनांक ४ रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्निश्यमन विभागाच्या वतीने सहा तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की अंबड येथील दत्त नगर रोड, दातीर नगर, आनंद वाटिका बिल्डिंग जवळील खान स्क्रॅप मटेरियल लाकड़ी फळ्यापासून इंडस्ट्रियल बॉक्स बनविण्याच्या रॉ- मटेरियलला मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास मोठी आग लागली. (Godowns in Ambad Industrial Estate caught fire nashik fire accident news)

आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ हवेत पसरले. या आगीत आजूबाजूचेही प्लॅस्टिक तसेच कपड्याचे तब्बल ७ गोडाऊन जळून खाक झाले.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्याकरिता अग्निशमन विभागाच्या सातपूर, सिडको, मुख्यालय विभागीय पंचवटी अग्निशमन केंद्र , नाशिक रोड अशा पाचही केंद्राच्या एकूण आठ ते नऊ अग्निशमन गाड्यांनी प्रत्येकी तीन खेपा मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समजते आहे.

तर सिडको केंद्राचे लि.फायरमन मुकुंद सोनवणे व सुनिल धुगे व वाहन चालक ईस्माईल काझी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.शहरातील इतर अग्निशमन केद्रांवरून फायर स्टाफ व वाटरटेंडर व बाऊजर, मेगा बाऊजर घटना स्थळी पोहचले.

Godowns in Ambad Industrial Estate caught fire nashik fire accident news
Nashik Fire Accident: जुन्या कसारा घाटात बर्निंग कारचा थरार
esakal

सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी,अंबड पोलीस स्टेशन, चुंचाळे औद्योगिक वसाहत पोलीस व सातपूर पोलीस स्टेशन येथील तिघंही पोलीस स्थानकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक प्रमोद वाघ ,मनोहर कारंडे , पंकज भालेराव , संदीप पवार यांसह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. आगीचे लागण्याचे कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यांचे झाले नुकसान

यात नसीम खान, जावेद खान, तुफेल खाम, अक्रम खान, लल्लू खान, अमीर लल्लू, कलाल मन्सूरी यांच्या गोडाऊनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून इतरही गोडाऊन व दुकानांना आगीचा धोका होता. मात्र तो टळला. आगीचे कारण मात्र समजू शकले नसून पोलीस तपास सुरू आहे.

Godowns in Ambad Industrial Estate caught fire nashik fire accident news
Nashik Crime: नाशिकच्या व्यापाऱ्याची तांदूळ खरेदीपोटी फसवणूक; प. बंगालच्या व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com