Nashik News : दसक शिवारातील अवैध अतिक्रमणावर हातोडा

Encroached constructions demolished in Dasak Shivara
Encroached constructions demolished in Dasak Shivaraesakal

Nashik News छ नाशिक शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम झपाटाने सुरू असून नाशिक रोड परिसरातील दशक येथील (स न ७८/७९-६ ब) अतिक्रमित बंगला पाडण्यात आला. 42 गुंठे जागेमध्ये सध्या 12 बंगले असून 1 बंगला जमीन दोस्त करण्यात आला.

सध्या अकरा बंगल्यांना उच्च न्यायालयाचा स्टे असून पावसाळ्यानंतर या बंगल्यांचे अतिक्रमण पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Hammer on illegal encroachment in Dasak Shivara Nashik News)

दसक शिवारात भूमाफियांनी 30 एकर जमिनीमध्ये शासनाचे सगळे महसूल आणि कर बुडवून या जमिनी गोरगरीब जनतेला विकले आहे. या जमिनींमध्ये कायदेशीर मालकी हक्क नसताना भूमाफियांनी शंभर रुपये नोटरीवर या जमिनी लोकांना विकले आहे.

दसक शिवारातील 42 गुंठे जमिनीत बारा बंगले अतिक्रमण करून बांधण्यात आले असून न्यायालयाने हे बंगले अनधिकृत ठरवले आहे.

यातील घरे वाचवण्यासाठी अकरा बंगले मालक हायकोर्टात गेलेले असून हे बंगले वाचवण्यासाठी भूमाफिया सध्या जिवाचा आटापिटा करीत आहे. अकरा बंगल्यांना सध्या मालकांनी स्टे आनला असून नरेंद्र बोराडे व उदावंत असे दोन एकाच जागेतील लगतची घरे जमीनदोस्त करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Encroached constructions demolished in Dasak Shivara
Nashik Fire Accident : सारडा सर्कलवर इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक

पहाटे सहा वाजेपासून पोलीस फौज फाट्यासह नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते घरमालकांनी आपले घरातील सामान बाहेर काढून पोलीस व मनपा प्रशासनाला सहकार्य केले त्यानंतर या दोन घरांवर बुलडोझर चालवण्यात येऊन ही घरे जमीनदोस्त करण्यात आली.

"आमची फसवणूक झाली असून आम्ही ज्यांच्याकडून घरे घेतली त्यांनी आमची घरे भरून दिली नाही तर त्यांच्यावर आम्ही नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करणार आहोत. जमीन विक्री करून आम्हाला फसवण्यात आले. यात आमचा काय दोष? शासन व्यवस्थेने कल्याणकारी दृष्टिकोनातून आमची दखल घ्यायला हवी होती. फसवणूक केलेल्यांनी आम्हाला दुसरे घर बांधून द्यावे," - नरेंद्र बोराडे. अतिक्रमणधारक

"माजी नगरसेवक दिनकर आढाव, पवन पवार, विलासराज गायकवाड, रवी पगारे, दीपक सदाकळे या भूमाफियांनी शासनाचा ३० ते ३५ करोड रुपये महसूल बुडवून येथील जागा लोकांना अवैध मार्गाने विकले आहे. न्यायालयाचे आदेश असूनही अतिक्रमण उपायुक्त इतक्या दिवस कारवाईसाठी टाळाटाळ करत होते. येथील घरमालकांनी फसवणूक केलेल्या भूमाफियांवर गुन्हा दाखल करावा. नाहीतर उपोषण करू."

- आनंद गांगुर्डे. मूळ जागा मालक.

Encroached constructions demolished in Dasak Shivara
Nashik News : धुळवडच्या दुर्गम डोंगरात आढळला अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com