esakal | 'नगरसेवक दाखवा, बक्षीस मिळवा!' हैराण नागरिक म्हणताएत तरी काय?
sakal

बोलून बातमी शोधा

grampanchayt elections.jpg

निवडणुकीच्या वेळी मतदारांकडे हात जोडून मतदान करा, अशी विनवणी करणारे नगरसेवक सध्या बेपत्ता झाल्याची भावना येथील नागरिक बोलून दाखवत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक या भागाकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

'नगरसेवक दाखवा, बक्षीस मिळवा!' हैराण नागरिक म्हणताएत तरी काय?

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : पावसाळ्यात सर्वच रस्त्यांवर खड्डे नित्याचेच झाले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी केलेली कामे दाखविण्यासाठी ‘खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा’ असे बोधवाक्य वापरले जाते; परंतु सध्या दत्तनगर परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे पाहून येथील नागरिक उपहासाने ‘नगरसेवक दाखवा, बक्षीस मिळवा’ असे म्हणत आहेत. 

‘नगरसेवक दाखवा, बक्षीस मिळवा’
प्रभाग २७ मधील दत्तनगर, कारगिल चौक, मारुती संकुल परिसर मागासलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे दोन व शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. त्यामध्ये राकेश दोंदे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे व कावेरी घुगे या नगरसेवकांचा समावेश आहे. चारपैकी केवळ एकच नगरसेवक दिसून येतो. बाकी तिघांचे दर्शनही होत नसल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखविली. 
अनेक वर्षांपासून येथील रस्त्यांची समस्या सुटत नसल्याने रस्त्यांची जागोजागी अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे केवळ रात्री-अपरात्रीच नव्हे, तर दिवसाही वाहनधारक व पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहनधारकांचे छोटे-मोठे अपघात, तसेच पायी जाणाऱ्यांवर उडणारा चिखल ही नित्याचीच बाब झाली आहे. 

बेपत्ता झाल्याची भावना
वारंवार तक्रारी करूनही महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक या भागाकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसराच्या शेजारीच अंबड औद्योगिक वसाहत असल्याने या ठिकाणी हातावर पोट असणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. निवडणुकीच्या वेळी मतदारांकडे हात जोडून मतदान करा, अशी विनवणी करणारे नगरसेवक सध्या बेपत्ता झाल्याची भावना येथील नागरिक बोलून दाखवत आहेत. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

तीन वर्षांपासून चारपैकी तीन नगरसेवकांनी साधे तोंड दाखविले नाही. त्यामुळे आमच्या परिसराचा विकास खुंटलेला आहे. आमच्या भागात अनेक समस्या आहेत. रस्त्याची पूर्ती चाळण झाली आहे. रस्ते लवकरात लवकर खड्डेमुक्त करावेत, अशी अपेक्षा आहे. -रावसाहेब कर्डिले, नागरिक 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

अंबड, चुचाळे, दत्तनगर, कारगिल चौक या भागामध्ये प्रभागाचे विद्यमान तीन नगरसेवक अद्यापर्यंत फिरकलेले नाहीत हे नागरिकांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. येथील विकासकामांमध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा वाटा नाही. टक्केवारीसाठी पुढे करणारे कामे मार्गी लावण्यासाठी मात्र गायब असतात. -राकेश दोंदे, नगरसेवक, प्रभाग २७ 


सध्या कोरोनामुळे बाहेर पडणे अवघड झाले आहे. आम्ही चारही नगरसेवकांनी परिसर वाटून घेतलेले आहेत. चुंचाळे, दत्तनगरचा परिसर राकेश दोंदे सांभाळतात, तर सिंहस्थनगर, अश्विननगर परिसर मी सांभाळतो. दत्तनगर परिसरात रस्ते व्हावेत यासाठी मी आयुक्तांना पत्र दिले आहे. 
-चंद्रकांत खाडे, नगरसेवक, प्रभाग २७ 

संपादन - ज्योती देवरे

loading image
go to top