नाशिकमध्ये घर घ्यायचा विचार करताय? ही बातमी वाचाच

nashik homes rates
nashik homes ratesesakal

नाशिक : कोरोनामुळे (coronavirus) निर्माण झालेला आर्थिक खड्डा भरून काढण्यासाठी राज्य शासनाने गौण खनिजावरील रॉयल्टीत केलेली वाढ व डिझेलच्या (disel rates) दरात सातत्याने वाढ होत असल्याने रेती, खडी, आर्टिफिशिअल सॅण्ड, स्टील व सिमेंट या बांधकाम साहित्यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे आता त्याचा एकत्रित परिणाम घरांच्या किमती (home price) वाढण्यावर होणार असल्याने साधारणतः अडीचशे ते तीनशे रुपये प्रतिचौरस मीटर दरवाढ होण्याची शक्यता असल्याने घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहेत. (House-prices-will-rise-in-Nashik-marathi-news)

घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर स्टील व सिमेंटच्या दरात अचानक वाढ झाली. या वाढीमागचे कारण अद्यापही स्पष्ट नसले तरी साठेबाजांकडून कृत्रिमरीत्या वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु असे असताना अद्यापही झालेली वाढ कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गौण खनिजावरील रॉयल्टीत वाढ केल्याने नवीन भर पडली आहे. डिझेलचे दर साठ रुपयांवरून ९३ रुपये झाले. खडी क्रशरच्या देखभाल- दुरुस्तीसाठी लागणारे अँगल, चॅनल, गर्डर, प्लेट आदींचे भाव ६५ रुपये किलोपर्यंत पोचले. खडी क्रशरवर काम करणाऱ्या मजुरांच्या रोजंदारीच्या दरात वाढ झाली. डंपरच्या किमती ४० लाखांपर्यंत पोचल्या, तर स्पेअरपार्टसचे दर वाढले. विजेच्या दरातही २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. आता शासनाने १ जुलैपासून गौण खनिज रॉयल्टीचे दर ४०० रुपये प्रतिब्रासवरून सहाशे रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अठरा टक्के जीएसटी, दहा टक्के डिस्ट्रिक्ट मायनिगं फंड, दीड टक्के टॅक्स कलेक्टेड सोर्स व अन्य खर्च यामुळे गौण खनिज प्रतिब्रास आठशे रुपयांपर्यंत जाणार आहे. दुप्पट दरवाढीने साहित्य खरेदी करावे लागणार आहे. त्यानंतर या सर्व दरवाढीचा बोजा अखेरीस घरांच्या वाढत्या किमतीच्या माध्यमातून ग्राहकांवर पडणार असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर घरांच्या किमती जाण्याची दाट शक्यता आहे.

nashik homes rates
भाजपचे नेते राऊत यांच्या मुक्कामी; नाशिकमध्ये चर्चेला उधाण

प्रत्येकासाठी घर संकल्पना बारगळणार

केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक व्यक्तीला घर मिळावे, यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. घरांच्या किमती कमी होऊन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गृहकर्जाच्या दरात कपात, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर, पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी दोन लाख ६४ हजारांचे अनुदान, मुद्रांक शुल्कात घट आदी योजना राबविल्या आहेत. परंतु एकीकडे सवलत दिली जात असताना दुसरीकडे मात्र बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याने प्रत्येकाला घर ही संकल्पना बारगळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अशी झाली वाढ

दीड वर्षापूर्वी साठ रुपये प्रतिलिटर डिझेलचे दर ९३ रुपयांपर्यंत पोचले. ४५ रुपये प्रतिकिलोचे स्टील ६५ ते ७० रुपयांपर्यंत गेले. खडी, वॉश, प्लास्टर सॅण्डच्या दरात तीस टक्क्यांनी वाढ झाली. या सर्वांचा परिणाम घरांच्या किमती वाढण्यात होणार आहे. शहरात साधारणतः तीन ते साडेचार हजार रुपये प्रतिचौरस फूट घरांच्या किमती आहेत. त्यात अडीचशे ते तीनशे रुपयांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

nashik homes rates
बर्थडे सेलिब्रेशन पडले महागात; मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा

दखल घेण्यापर्यंत दरवाढ झाल्याने अडीचशे ते तीनशे रुपये प्रतिचौरस फूट रुपयांनी घरांच्या किमती वाढविणे अपरिहार्य आहे. यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो.

अनेक वर्षांपासून क्रशरच्या साधन सामग्रीच्या किमतीत वाढ होत असल्याने दरवाढ करणे अपरिहार्य आहे. - जयंत आव्हाड, नाशिक जिल्हा स्टोन क्रशर ओनर्स संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com