

Vidhan Parishad Election
नाशिक - विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग अपक्ष उमेदवार गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांनी प्रचार थांबविल्यानंतर सुकर झाला असला, तरी मतपत्रिकेवर दोघांचीही नावे कायम राहणार असल्याने महायुतीने सावध भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदार नगरसेवकांची सहल आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शनिवारी (ता. १३) नगरसेवकांचा ताफा मुंबईकडे रवाना होणार आहे.