Maharashtra Politics | हिंदुत्ववादी विचारांचा विजय : खासदार गोडसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant Godse Latest Marathi News

Maharashtra Politics | हिंदुत्ववादी विचारांचा विजय : खासदार गोडसे

सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ठाकरे यांनी त्यांचे उभे आयुष्य वेचले.परंतु उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देत नैसगिक मित्र असलेल्या भाजपशी युती तोडून सत्तेसाठी कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसशी घरोबा केला.

नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेससोबत जात सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि भूमिका कायमच जिवंत रहायला हवेत, या हेतूपोटी सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत भाजपशी युती करून सत्ता स्थापन केली. (MP Hemant Godse statement ver shiv sena symbol destribution Victory of Hindutva ideas Maharashtra Politics nashik news)

शिंदे यांनी भूमिका योग्य असल्याने चाळीस आमदार, तेरा खासदार, अनेक नगरसेवक अन हजारो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे सेना सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबाच्या शिवसेनेत प्रवेश केला.

या दरम्यान सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्याचा आज निकाल लागला. निवडणूक आयोगाला मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका योग्य वाटल्याने त्यांनी शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्हही मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेला दिले.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खासदार गोडसे यांनी आजचा निकाल म्हणजे सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा विजय असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

"ज्यांच्याकडे बहुमत असेल मूळ पक्ष आणि चिन्ह त्यांनाच मिळते असे अनेक उदाहरण आहेत. या निकालाचे आम्ही स्वागत करतो. हा विजय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि हिंदुत्वाचा विजय आहे. येत्या काळात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल."

- आमदार सुहास कांदे, नांदगाव विधानसभा मतदारसंघ

"केंद्रीय निवडणूक आयोग या स्वायत्त्य संस्थेने न्यायनिवाडा केला. त्यांची मी आभार मानतो. घटना, कायदा, नियम यावर आमचा विश्‍वास आहे. घटनेत व लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमदार, खासदार, पदाधिकारी आदींचे बहुमत आमच्याकडे होते. सत्याचा विजय झाला आहे. प्रभू श्रीरामचंद्र, भगवान एकलव्य यांचे धनुष्यबाण आम्हाला मिळाले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न साकार करू. शिवसेना मजबूत आहे. ती दिवसेंदिवस मजबूत होईल."

- दादा भुसे, बंदरे व खणीकर्म तथा पालकमंत्री, नाशिक