नाशिक : बुरशीजन्य आजाराबाबत काळजी घेण्याचे आवाहन

Fungal-Infection
Fungal-Infectionesakal

मालेगाव (जि. नाशिक): शहर व परिसरात बुरशीजन्य आजाराचे रुग्ण (Fungal Diseases Patient) मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. नागरिकांनी आजाराबाबत काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) भालचंद्र गोसावी यांनी केले आहे.

Fungal-Infection
Russia Ukirane War : एटीएम,बाजारपेठेत गर्दी, पण मनामध्ये भीती कायम

बुरशीजन्य आजाराच्या (Fungal Diseases) अनुषंगाने त्वचारोगतज्ज्ञ (Dermatologist) डॉ. अनिल भोकरे (Dr. Anil Bhokare) यांनी आजाराची कारणे व उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले आहे. सदर आजाराचे रुग्ण त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला न घेता अनेक प्रकारचे मलम लावतात. सदर मलमामध्ये स्टेरॉईडचे (Steroid) प्रमाण असते. ती स्वस्त मिळतात व लगेच परिणाम दाखवितात. परंतु, अशी औषधे आजार बरा करत नाहीत. त्यामुळे वरुन चट्टा बरा होतो. तसेच, खाजही तात्पुरती बंद होते. वास्तविक असे मलम (Ointment) आजाराचे प्रमाण वाढवितात. सदर बुरशीजन्य आजार टाळण्यासाठी शहर व परिसरातील नागरिकांनी योग्य त्या प्रतिबंध उपाययोजना कराव्यात. ओले कपडे घालणे, तंग व जाड कपडे घालणे, दमट वातावरणात काम करणे, प्रवास करणे व मधुमेह यामुळे बुरशीजन्य आजार होतो. स्वच्छ व हवेशीर राहणीमान, जाड कपडे (जिन्स) जास्त वापरु नयेत, रोज कोमट पाण्याने अंघोळ करणे, शरीर कोरडे पुसणे, परस्पर औषधोपचार न करता योग्य त्या त्वचारोगतज्ज्ञांच्या (Dermatologist) सल्ल्याने (Advice) उपचार (Treatment) करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Fungal-Infection
बँकेत Joint Savings Account उघडण्याचे अनेक फायदे, काय आहेत नियम, सुविधा?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com