
नाशिक : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा झाला आहे. मात्र मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे पावसाळा संपेपर्यंत मराठवाड्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा न झाल्यास नाशिकमधील धरणांमधून पाणी सोडावे लागणार असल्याने पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील धरणे रिकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. (Heavy rain in dam area of district)