Nashik Crime: नाशिक रोड फायरिंग प्रकरणी ठाकरे अन् शिंदे गटाकडून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

नाशिक रोड : शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीप्रसंगी गुरुवारी (ता.0 १९) रोजी रात्री देवळाली गाव येथे शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात शिवीगाळ धक्काबुक्की व त्यानंतर हवेत गोळीबार करण्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचे पुत्र स्वप्निल लवटे यास अटक करण्यात आली आहे.

Nashik Crime News
Nashik Crime News : नाशिक रोडला गोळीबार; शिवसेनेच्या ठाकरे अन् शिंदे गटात जुंपली

या संदर्भात शिंदे गटाचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भैय्या मणियार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

गुरुवारी सायंकाळी शिवजन्मोत्सव समितीची बैठक चालू असतांना भैय्या मणियार, प्रशांत जाधव, सागर कोकणे व त्यांचे ८० ते १०० कार्यकर्ते आले व शिवजन्मोत्सव समितीच्या हिशोब मागण्याच्या कारणावरून हातात कोयते व तलवार लाठ्या-काठ्या घेऊन आपणास शिवीगाळ करून दमदाटी केली. गर्दीत कुणीतरी अज्ञात आरोपीने बंदुकीतून गोळी झाडली.

Nashik Crime News
Nashik Crime News : बंटी-बबलीची पुन्हा करामत; महिलेच्या डोळ्यादेखत लांबवले दागिने अन् रोख रक्कम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com