corona second patient 11.jpg
corona second patient 11.jpg

नाशिकच्या "त्या' कोरोनाबाधित रुग्णाची हीच ती "ट्रॅव्हल्स हिस्ट्री"

Published on

नाशिक :  भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच नाशिकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने इथेही धाकधूक वाढली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानापासून एक दीड किलोमीटर अंतरावर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यानंतर मनोहर नगर, गोविंदनगरपासून तीन किमी परिसर सील करण्यात आला आहे. 

कोरोनाबाधित व्यक्तीचा विविध भागात संचार 

शहरात दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे कोरोनाबाधित व्यक्तीची 2 मार्चपासून शहरातील प्रवासाचा इतिहास (ट्रॅव्हल्स हिस्ट्री) तपासण्यात आला. त्यात संबंधित व्यक्ती सर्वाधिक काळ गोविंदनगर परिसरातील विविध दुकाने व जुन्या कॅनॉल येथे संचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लोकांनी पुढे येऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन
त्याचबरोबर मुंबई नाका येथील स्टेट बॅंक व संत निरंकारी भवन परिसर, रेणुकानगर, गायकवाडनगर परिसरात संचार झाला आहे. गोविंदनगर येथील विविध मेडिकल, तसेच जॉगिंग ट्रॅकवर संचार झाला. सागर स्वीट्‌स दुकान परिसरात दोनदा, पवननगर भागात दोनदा, लेखानगर, सिडकोतील शिवाजी चौकातील भाजी मार्केट, सावरकरनगर, पारिजातनगरमध्ये दोनदा संचार केला. नाशिक रोड भागातील शिखरेवाडी, जलतरण तलाव, नाशिक-पुणे महामार्गावरील मेट्रो मॉल परिसर, तिडके कॉलनी, फ्रावशी अकादमी परिसरात संचार झाल्याचे ट्रॅव्हल्स हिस्ट्रीवरून स्पष्ट झाले आहे. संपर्कात आलेल्या नागरिकांचा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून शोध घेतला जात असून, अशा लोकांनी पुढे येऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com