Nashik BJP News : भाजपवरही भाकरी फिरवण्याची वेळ?

Need to change party organization in BJP like congress nashik news
Need to change party organization in BJP like congress nashik newsesakal

कुठलाही राजकीय पक्ष हा निःस्पृह पदाधिकारी आणि कष्टाळू तसेच प्रामाणिक कार्यकर्त्यांवर वाढतो, टिकतो. काँग्रेसचा एक काळ होता. काँग्रेस (Congress) सत्तेत आणि चर्चेत असताना नाशिक जिल्ह्यात मुरलीधर माने, गोपाळराव गुळवे आणि जयप्रकाश छाजेड केवळ या तीन पदाधिकाऱ्यांभोवती फिरत राहिला.

काँग्रेसमध्ये पक्षातील अन्य नेत्यांना फारसा वाव मिळाला नाही. पर्यायाने काँग्रेसची पतनाकडे वाटचाल सुरू झाली. (Need to change party organization in BJP like congress nashik news)

सध्या नाशिक भाजपमध्येही हीच परिस्थिती दिसून येत आहे. मोजके दोन आमदार आणि काही ठराविक पदाधिकाऱ्यांभोवती भाजप फिरतोय. त्यामुळे भाजपची वाटचालही काँग्रेसच्या दिशेने होत चालली आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

वास्तविक नऊ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्‍मा देशभर दिसून येत आहे. या प्रभावामुळे अन्य पक्षांतील अनेक दिग्गज नेते भाजपत डेरेदाखल झाले. २०१४ च्या सुमारास १४-१५ नगरसेवकांदरम्यान अडकून पडलेल्या भाजपने मोठी झेप घेतली. सध्या भाजप नगरसेवकांची संख्या ६६ आहे.

अगदी नाव घ्यायची झाल्यास दिनकर पाटील, दिनकर आढाव, शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे, सुरेश पाटील यांची नावे घेता येतील. नव्या दमाच्या नेतृत्वामध्ये गणेश गिते, हेमंत गायकवाड यांचा समावेश होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Need to change party organization in BJP like congress nashik news
Congress Vs BJP : काँग्रेस की भाजप? मध्य प्रदेशात कोणाला मिळेल मुख्यमंत्रीपद? वाचा सर्व्हे काय सांगतो

पण नेत्यांचा यथायोग्य उपयोग भाजपने आजवर करून घेतला नाही. केवळ सातपूर-सिडकोचा विचार केला असता एकही भाजप नगरसेवक नसलेल्या प्रभागांमध्ये आता २० नगरसेवक आहेत. ही ताकद निर्माण करणाऱ्यांची कदर न झाल्यास त्याचा फटका आगामी निवडणुकांत निश्चितपणाने भाजपला बसेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

अगदी विधानसभेत म्हटले तरीदेखील राहुल ढिकले यांना उद्धव निमसे, दिनकर आढाव या नेत्यांचा फायदा झाला. शिवाजी गांगुर्डे, सुरेश पाटील यांची देवयानी फरांदे यांना मदत झाली. सातपूर, सिडकोतून दिनकर पाटील हे सीमा हिरे यांच्यासाठी उपयोगी ठरले. शहरात या राजकीय धुरंधरांची ताकद मोठी आहे. मात्र त्यांना यथायोग्य जबाबदाऱ्या पक्षाकडून आजवर दिल्या गेलेल्या नाहीत. सध्या नाशिक भाजपची अवस्था नेतृत्वाविना चाचपडत असल्यासारखी आहे.

काँग्रेसमध्ये ज्याप्रमाणे नेतृत्व तयार झाले नाही, त्याचप्रमाणे भाजपमध्ये जुन्या-जाणत्या, अनुभवी नेत्यांना योग्य किंमत दिली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. सध्याचे भाजपचे नेते मतदारसंघापलीकडे पाहायला तयार नाहीत.

Need to change party organization in BJP like congress nashik news
Nashik BJP News : दंगलींच्या माध्यमातून सत्ता गेलेल्यांची तडफड : केशव उपाध्ये

त्यामुळे भाजपमध्येही खांदेपालट करण्याची गरज आहे. पक्ष संघटनेत बदल न झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम निश्चितपणे दिसून येतील, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार होत आहे. ३० वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असणारे प्रमुख पदाधिकारी केवळ एकदा नगरसेवक झाले. मात्र पाच-सहा टर्म निवडून येणारे नेते सध्या मुख्य प्रवाहाबाहेर आहेत.

जुन्याजाणत्या अनुभवी नेत्यांच्या ताकदीचा वापर भाजप केव्हा करणार, हा खरा प्रश्न आहे. नवीन फळी तयार करण्याची वेळ आता आली आहे. ग्रामीणमधील भाजपची परिस्थिती वाईट आहे. केंद्रातील सत्तेच्या नऊ वर्षांनंतरही नाशिकच्या ग्रामीण भागात भाजप वाढू, रुजू शकलेला नाही.

यासाठी कोणते पदाधिकारी, नेते जबाबदार आहेत, याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे आता नाशिक भाजपवरही भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Need to change party organization in BJP like congress nashik news
Nashik BJP News: काकांवर पुतण्याची पत्रकाद्वारे टीका! भाजपमधील वाद चव्हाट्यावर

भाकरी फिरलीच पाहिजे

मुंबईसह नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे, नवी मुंबई भारतीय जनता पक्षासाठी महत्त्वाचे आहे. लोकसभा व विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न आहेत. हे करत असताना जाती समीकरणे जुळविण्याचेही भाजपसमोर आव्हान आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा नाशिकमध्ये सभा घेणार असून, या सभेतूनच लोकसभेचे रणशिंगही फुंकणार आहेत.

या अनुषंगाने विचार करता नाशिक भाजपसाठी महत्त्वाचे आहे. भाजपला महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच विधानसभेत शहरासह ग्रामीण भागातही मुसंडी मारायची आहे. लोकसभा टार्गेट तर आहेत. मात्र, असे करत असताना पक्ष संघटनेत आलेली मरगळ झटकण्यासाठी भाकरी फिरवलीच पाहिजे, असा सूर संघटनेतून उमटत आहे.

विशेषकरून शहराच्या बाबतीत अधिक चर्चा होत आहे. नाशिक शहरातून भाजपला आघाडी घ्यायची असेल, तर पक्ष संघटनेच्या प्रमुख पदावर मराठा नेतृत्वाची नितांत आवश्यकता भासणार आहे. त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Need to change party organization in BJP like congress nashik news
Nashik BJP News : भाजपला मोठा धक्का! आमदार सीमा हिरे यांचे बंधू काँग्रेसवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com