esakal | सटाणा, नामपूर, डांगसौंदणे रुग्णालयात होणार ऑक्सिजन प्लांट - दीपिका चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika Chavan

सटाणा, नामपूर, डांगसौंदणे रुग्णालयात होणार ऑक्सिजन प्लांट - दीपिका चव्हाण

sakal_logo
By
अंबादास देवरे

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर व डांगसौंदाणे या तिन्ही ग्रामीण रुग्णालयांत ऑक्सिजननिर्मिती (Oxygen Plant) केंद्र उभारण्यास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण (MLA Deepika Chavan) यांनी दिली. (Oxygen generation plant will be set up in Baglan taluka)

...ऑक्सिजन कमतरता टळणार

आमदार दीपिका चव्हाण म्हणाल्या, की कोरोना संकटात ऑक्सिजन कमी पडू लागल्याने मोठी गैरसोय होत होती. सटाणा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण करण्याची मागणी केली होती. रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला तसे थेट आदेश दिले आहेत. यात सटाणा, नामपूर व डांगसौंदाणे यांचा समावेश करण्यात आला आहे. बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर व डांगसौंदाणे या तिन्ही ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजननिर्मिती केंद्र उभारावे, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रत्यक्ष भेटून दीपिका चव्हाण यांनी केली होती. या मागणीचे निवेदनही दिले होते. याबाबत रविवारी पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना आदेश दिले आहेत, तर आरोग्यमंत्री यांनीदेखील तसे लेखी आदेश जिल्हा चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍यूकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

नऊ ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्‍नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, यासाठी पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यात नऊ रुग्णालयांमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी दिली आहे.

''सटाणा, नामपूर व डांगसौंदाणे येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील भीती दूर होईल. ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्यामुळे भविष्यात कितीही मोठे संकट आल्यास ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत.''

-दीपिका चव्हाण, माजी आमदार, बागलाण

हेही वाचा: दिलासादायक! नाशिकमध्ये ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या घटली

loading image