Talathi Bharti : तलाठी भरती पेपरफुटीत मोठे रॅकेट; गणेश गुसिंगेचा 'या' भरतीच्या पेपरफुटीतही हात

police and MHADA recruitment paper also leak by Ganesh Gusinge talathi bharti paper leak nashik crime news
police and MHADA recruitment paper also leak by Ganesh Gusinge talathi bharti paper leak nashik crime newsesakal

Talathi Bharti : तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणाला शनिवारी (ता. १९) वेगळेच वळण मिळाले. पोलिसांच्या ताब्यात असलेला गणेश गुसिंगे याचा पिंपरी-चिंचवड पोलिस भरती व म्हाडा पेपर फुटीत हात असल्याचे समोर आले आहे.

संशयित गणेशचे नातेवाईक महसूल व वन विभागात कार्यरत असल्याची माहितीही तपासात समोर आली. त्यामुळे तलाठी भरतीच्या पेपर फुटीत मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. (police and MHADA recruitment paper also leak by Ganesh Gusinge talathi bharti paper leak nashik crime news)

म्हसरूळ येथील वेब इन्फोटेक सोल्यूशन या केंद्रावर तलाठी पेपर फुटी प्रकरणी गणेश शाससिंग गुसिंगे (वय २८, रा. संजारपूरवाडी, परसोडा, ता. वैजापूर), सचिन नायमाने, संगीता रामसिंग गुसिंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित गणेश गुसिंगे हा एक सराईत पेपरफोड्या असल्याचे समोर येत आहे. म्हाडा आणि पिंपरी-चिंचवड पोलिस भरती घोट्याळ्यात त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

संशयिताविरोधात म्हाडा परीक्षा भरतीत गैरप्रकार प्रकरणी खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस भरती २०१९ मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यावर याच गुसिंगेवर २०२१ मध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्याला अटक करण्यास एवढे दिवस कसे लागले, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

संशयितांचा शोध सुरूच

तलाठी भरती परीक्षेच्या हायटेक कॉपी प्रकरणात संशयित आरोपीबरोबर अजून दोन नावे पुढे आली आहेत. त्यात संशयिताची बहीणच परीक्षेसाठी उमेदवार होती. परंतु, दोन दिवसांपासून संशयिताची बहीण आणि साथीदार पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिस पथक अजूनही त्यांच्या शोधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे तळ ठोकून आहे, अशी माहिती म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

police and MHADA recruitment paper also leak by Ganesh Gusinge talathi bharti paper leak nashik crime news
Talathi Bharti: तलाठी भरती गैरप्रकाराबाबत फडणवीसांना आधीच सांगितलं होत, तरी आरोपी मोकाट कसा?; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सवाल

"गुन्ह्याची व्याप्ती व प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आले आहेत. फरारी संशयितांच्या शोधार्थ एक पथक व दुसरे पथक हे गुन्हा कसा घडला, याविषयी तांत्रिक बाबींची माहिती संकलन करणार आहे." - डॉ. सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक शहर

"गणेश घुसिंगे हा फक्त एक मोहरा आहे. त्यांच्या टोळीत काही खासगी क्लासचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उत्तरे सांगणारे मुलेही असतात. अशा अनेक टोळ्या कार्यरत आहेत. याचा तपास करायचा असेल तर शासनाला हा गुन्हा नाही, तर अशा अनेक गुन्ह्यांसाठी एक SIT स्थापन करावी लागेल. त्याशिवाय, याचा छडा लागणार नाही. त्याने अनेक परीक्षांचे पेपर फोडले असणार आहेत. त्याचा मोबाईल व्यवस्थित तपासून सर्व पेपरफुटी बाहेर काढावी, ही नम्र विनंती." - राहुल कवठेकर, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

police and MHADA recruitment paper also leak by Ganesh Gusinge talathi bharti paper leak nashik crime news
Nashik Bribe Crime : आश्रमशाळा इमारत भाड्याच्या बिलासाठी लाच घेताना लेखाधिकारी अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com