Nashik News: पोलिस ठाण्याच्या विभाजनाचे प्रस्ताव प्रलंबितच; अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यांना गुन्हेगारीचे ग्रहण

Work in progress on new building of Suburban Police Station. (Photo: Ambadas Shinde)
Work in progress on new building of Suburban Police Station. (Photo: Ambadas Shinde)esakal

Nashik News : अवाढव्य कार्यक्षेत्र, सर्वाधिक हिस्ट्री शीटर, जास्तीत जास्त गुन्हे, अपुरे मनुष्यबळ, इमारतीचा प्रश्न अशा नानाविध प्रश्नांमुळे उपनगरच्या गुन्हेगारीचा आलेख कायमच उंचावलेला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी विभाजन झाले नाही, तर उपनगरसोबतच अंबड भागातील गुन्हेगारी ऐन सिंहस्थात शहराची मोठे डोकेदुखी ठरणार आहे.

उपनगर आणि चुंचाळे अशा दोन पोलिस ठाण्यांच्या विभाजनाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. उपनगर पोलिस ठाण्याचे तर दोन प्रस्ताव पाठवूनही महत्त्व दिले जात नाही. शहरातील गुन्हेगारी हा विषय सहा महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. १३ पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात उपनगर आणि अंबड भागातील गुन्हेगारी डोकेदुखीचा विषय आहे. (proposal for division of police station is pending nashik news)

गुन्हेगारीचा कळस

उपनगर पोलिस ठाण्याला प्रतिभूती मुद्रणालयाच्या नेहरूनगर या शासकीय वसाहतीत इमारतीसाठी महापालिका शाळा क्रमांक १०६ ची इमारत तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली. ही इमारत खाली करावी म्हणून मुद्रणालय प्रशासन कितीतरी वेळ पत्रव्यवहार करून थकले आहे. सरतेशेवटी काही वर्षांनंतर उपनगर पोलिस ठाण्यासाठी उपनगर येथील बहुचर्चित भूतबंगल्याशेजारील मोकळ्या जागेत इमारतीचा प्रस्ताव पुढे आला.

आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून इमारतीचा विषय मार्गी लागतो आहे. अद्ययावत स्वरूपाची इमारत येथे मिळणार आहे; पण त्याला वेळ लागणार आहे. इमारतीचा प्रश्न सुटणार असला तरी, गुन्हेगारी कधी नियंत्रणात येणार, हे मात्र कुणीच ठामपणे सांगू शकत नाही.

गुन्हेगारीचे मूळ सदोष विभाजनात

तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे आधीच चुकीचे विभाजन झालेल्या पोलिस ठाणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवसापासून विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्याचे अगदी घाईने विभाजन उरकण्यात आले.

कुठली सोय नसताना आणि पोलिस ठाणे निर्मितीचे निकष बाजूला ठेवून केवळ तत्कालीन अधिकाऱ्यांच्या आग्रह आणि सोयीसाठी चौकीच्या जागेत तंबू ठोकून आणि मनुष्यबळ देताना आयुक्तालयातील विविध व्याधींनी ग्रस्त तब्बल १३ जायबंदी कर्मचारी देऊन चौकीत पोलिस ठाणे सुरू करीत विभाजनाचा सोपस्कार उरकला गेला.

Work in progress on new building of Suburban Police Station. (Photo: Ambadas Shinde)
Nashik News: पावसाळ्यात उद्याने बंद तरीही देखभाल; महासभेवर अडीच कोटींची देयके

त्या दिवसांपासून अपुरे मनुष्यबळ, इमारतीचा अभाव, अवाढव्य कार्यक्षेत्र, अवैध धंद्येवाले, राजकीय नेत्यांचा दबाव आणि कुख्यात गुन्हेगारांचा राबता यामुळे कायमच उपनगर पोलिस ठाणे चर्चेत राहिले. वास्तविक, नाशिक-पुणे महामार्गाच्या दक्षिण-उत्तर असे सोयीचे विभाजन शक्य असताना जेल रोड रस्ता विभाजनाला गृहीत धरला गेला.

त्यामुळे उपनगर पोलिस ठाण्यावर प्रचंड ताण, तर नाशिक रोड ठाण्याकडे रेल्वेस्थानक आणि ग्रामीण खेडे असे विषम कार्यक्षेत्र वाटले गेले. हे सदोष विभाजन, हेच नाशिक रोडच्या गुन्हेगारीचे मूळ आहे. सर्वाधिक झोपडपट्या, सर्वाधिक हिस्ट्री शीटर, सर्वाधिक किचकट अवाढव्य कार्यक्षेत्र हे उपनगर पोलिस ठाण्याकडे आले.

चुंचाळे अन् विहीतगावला गरज

उपनगरला कॅनॉल रोड, जय भवानी रोड आणि देवळाली गाव, नारायण बापूनगर, तर अंबडला एमआयडीसी, घरकूल, चुंचाळे हा परिसर हे गुन्हेगार जन्माला घालणारे केंद्र आहेत. नवीन अल्पवयीन गुन्हेगार या भागात तयार होतात. गुन्हेगारीचे केंद्रबिंदू असलेल्या भागात नवीन गुन्हेगार तयार होण्याचे केंद्र झाले आहे. एमआयडीसी चोऱ्या, कामगारांचे वेतनाचा दिवशी हमखास गुन्हे घडणार, परप्रांतीयांवर नियंत्रण नाही. अंबड लिंक रोड, दत्तनगर, चुंचाळे आणि

घरकूल हे आव्हानात्मक भाग आहे. कॅनॉल रोडला निसर्ग गोविंद सोसायटीत तर सगळ्या शहरातील सराईत आणि हद्दपारांना आश्रय दिला जातो. नेहरूनगर, गांधीनगर या बंद शासकीय वसाहतीतील नळ, पंख्यासह साहित्याची चोरीतून अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत आणले जाते. त्यामुळे सातपूर-अंबडचे विभाजन करून चुंचाळे आणि देवळाली कॅम्प आणि उपनगरचे विभाजन करून विहीतगाव असे नवीन पोलिस ठाण्यांना मान्यता मिळण्याची गरज आहे.

दोन प्रस्ताव प्रलंबित

उपनगर पोलिस ठाण्याच्या विभाजनाचे तत्कालीन आयुक्त दीपक पांडे यांच्या कारकीर्दीत आणि एकदा त्यापूर्वी असे दोनदा प्रस्ताव दिले गेले. मात्र त्यांना मान्यता मिळालेली नाही. नवीन पोलिस ठाणे निर्मितीचे गृह विभागाचे निकष आहे. त्यात साधारण १४० आणि त्याहून अधिक गुन्हे घडणारे, तसेच इतरही अनेक निकषात बसत असूनही प्रस्ताव मान्य होत नाही, ही नागरिकांची खंत आहे. विभाजनाकडे दुर्लक्ष होत राहिल्यास सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक शहराचे चित्र भयावह असेल.

Work in progress on new building of Suburban Police Station. (Photo: Ambadas Shinde)
Nashik News: किती महिलांना मिळाले स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण? आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने कामात बदल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com