रॅपिड एंटीजेन किट करणार कोरोनाचे तत्काळ निदान..अर्ध्या तासात कळणार रिपोर्ट..!

nurse corona.jpg
nurse corona.jpg

नाशिक : कोरोनाचे निदान करण्यासाठी महापालिकेला प्राप्त झालेल्या रॅपिड ऍण्टीजेन किट च्या माध्यमातून बुधवार (ता.८) पासून प्रतिबंधित क्षेत्रात तपासणी केली जाणार असून या माध्यमातून अर्ध्या तासात संबंधित व्यक्ती कोरोना बाधित आहे किंवा नाही याचे निदान होणार आहे. पेठ रोडवरील मायको दवाखाना व वडाळा येथील शहरी आरोग्य केंद्रात या तपासण्या केल्या जाणार आहे.

एकुण 8900 किट प्राप्त

एखादा व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मात्र पुन्हा त्याची तपासणी होणार नसल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. 
शहरात मे महिन्याच्या अखेर पासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतं आहे. जुन महिन्यात कोरोनाचे तीन हजार रुग्णांचा टप्पा गाठला तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतं आहे. सध्या महापालिकेच्या वतीने रुग्णांचे स्वॅब तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यास साधारण एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे उपचाराला देखील विलंब होतो. लवकर निदान होत नसल्याने ईतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता अधिक असल्याने पालिकेने रॅपिड ऍण्टीजेन किट च्या माध्यमातून तपासणी करण्याचा निर्णय घेतला. पालिकेने 4900 किट खरेदी केले तर शासनाकडून चार हजार किट प्राप्त झाले. असे एकुण 8900 किट प्राप्त झाल्याने बुधवार (ता. 8) पासून तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दाट लोकवस्तीच्या भागात होणार तपासणी 
दाट लोकसंख्येच्या वस्ती मध्ये कोरोना कम्युनिटी स्प्रेडची शक्‍यता अधिक असल्याने विशेषता या भागात चाचण्या घेतल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरात पहिला कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वडाळा गावातील शहर आरोग्य केंद्रावर तपासणी केली जाणार आहे. दुसरी चाचणी फुले नगर परिसरातील पालिकेच्या मायको रुग्णालयात तपासणी केली जाणार असून पालिकेने तयारी पुर्ण केली आहे. 

निगेटिव्हची पुन्हा चाचणी नाही 
रॅपिड ऍण्टीजेन किटच्या माध्यमातून तपासणी करताना एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर पुन्हा चाचणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू ज्यांना कोरोनाची लक्षणे असतील त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यांची पुन्हा चाचणी घेतली जाणार आहे. यापुर्वी शहरात निगेटिव्ह रुग्णांची पुन्हा-पुन्हा चाचणी घेतली जाणार असल्याची चर्चा होती परंतू वैद्यकीय विभागाने या चर्चेला विराम दिला आहे. 

निगेटिव्ह रिपोर्ट तरी त्यांची पुन्हा चाचणी

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वडाळा व फुले नगर भागात पहिल्या टप्प्यात चाचणी केली जाणार आहे. सर्दी, ताप, खोकला असलेल्या नागरिकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. - डॉ.राजेंद्र त्र्यंबके, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com