esakal | राज्यातील कामांना "ब्रेक' लावणारे "अमर-अकबर-ऍन्थोनी' सरकार! 
sakal

बोलून बातमी शोधा

danve.jpeg

मुंबईत नाइट-लाइफ सुरू करण्याची कल्पना शिवसेनेने पूर्वी मांडली होती. मात्र, भाजपने त्याला मान्यता दिली नव्हती. त्यामुळे आता त्या मुद्द्याला पाठिंबा असण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. याखेरीज शिर्डी आणि पाथरी या दोन गावांमधील वाद जुना आहे. सरकारने मध्यस्थी करून तो मिटवायला हवा

राज्यातील कामांना "ब्रेक' लावणारे "अमर-अकबर-ऍन्थोनी' सरकार! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात विकासकामांना "ब्रेक' लावणारे "अमर-अकबर-ऍन्थोनी' सरकार आहे. त्यांच्यात एकवाक्‍यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही, असे टीकास्त्र केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता. 19) येथे सोडले. जनतेच्या मूळ प्रश्‍नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी ऐतिहासिक वादाला फोडणी दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ऐतिहासिक वादाला फोडणी 

भारतीय जनता पक्षाच्या वसंत-स्मृती कार्यालयात दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मुंबईत नाइट-लाइफ सुरू करण्याची कल्पना शिवसेनेने पूर्वी मांडली होती. मात्र, भाजपने त्याला मान्यता दिली नव्हती. त्यामुळे आता त्या मुद्द्याला पाठिंबा असण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. याखेरीज शिर्डी आणि पाथरी या दोन गावांमधील वाद जुना आहे. सरकारने मध्यस्थी करून तो मिटवायला हवा. त्याचप्रमाणे तहसीलदारांना खुर्चीत बसवून कारभार होत नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्चीत बसून प्रशासन चालवायला हवे. तसे घडत नसल्याने जनता लवकर राज्य सरकारबद्दल निराशा व्यक्त करायला सुरवात करेल. 


प्रदेशाध्यक्षांची लवकर निवड 
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड सोमवारी (ता. 20) होणार आहे. त्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्षांची निवडही लवकरच होईल, असे सांगत श्री. दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा केला. ते म्हणाले, की बुधवारी (ता. 22) जम्मू-काश्‍मीरमध्ये जाऊन जनतेच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या केंद्र सरकारला कळविणार आहे. याशिवाय नागरिकत्व कायद्यासंबंधी विरोधकांनी भ्रम पसरवला आहे. कायद्याविषयी माहिती मुस्लिम समाजात दिली जाणार असून, तीन कोटी लोकांपर्यंत माहिती पोचविली जाणार आहे. शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, सुनील बागूल, लक्ष्मण सावजी, विजय साने आदी उपस्थित होते. 
 

हेही वाचा> "माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा"..तिने नकार देताच..  

भेटीने होत नाही युती 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीकडे लक्ष वेधल्यावर दानवे यांनी भेटण्यातून एकत्र आले असे होत नाही आणि युती होईल असा अर्थ काढू नका, असा निर्वाळा दिला. लोकसभा निवडणूक न लढविण्यासंबंधी अर्जुन खोतकर यांनी केलेल्या विधानातून माझ्यावर आरोप केला नाही, असे ते म्हणाले. राजूरच्या श्री गणपती मंदिरच्या जमीन प्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपाबद्दल दानवे म्हणाले, की या संस्थेचा सचिव मी आहे. संस्थेची जमीन कुणीही बळकावलेली नाही. त्यांनी माझे नाव घेऊन आरोप करावेत. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मात्र ते वैफल्यग्रस्त अवस्थेत बरळत आहेत. 

हेही वाचा>  PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

loading image