Nashik Rice Farming: डोंगरदऱ्यात बहरली भात शेती! 29 हजार 710 हेक्टरवर भाताची लागवड

Paddy fields flourished due to satisfactory rainfall in the taluk.
Paddy fields flourished due to satisfactory rainfall in the taluk.esakal

Nashik Rice Farming : तालुक्यातील डोंगरदऱ्यात सध्या भात शेती बहरली आहे. यंदा खरीप हंगामाच्या एकूण सर्वसाधारण पिकनिहाय क्षेत्र ३८ हजार ७७९ हेक्टर आहे. मागील वर्षी पिकनिहाय क्षेत्र ३३ हजार ३३२ होते.

त्यात भात पिकासाठी १९ हजार ८४२ हेक्टर ठेवले होते. या वर्षी पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून, तालुक्यात २९ हजार ७१० हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. (Rice farming flourished in the hills Rice cultivation on 29 thousand 710 hectares nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

आदिवासी भागातील त्रिंगलवाडी, वाळविहीर, धारगाव, आडवण, वैतरणानगर आदी गावांच्या शेतकऱ्यांनी नागली, वरई आदी पिके घेतली आहेत.

यंदा ९७८ हेक्टर क्षेत्रात नागली, ९६४ हेक्टर क्षेत्रात वरई, ५३ हेक्टरवर खुरासणी, तर २९ हेक्टर क्षेत्रात मक्याची पेरणी झाली आहे, तर २४ हेक्टरवर उडीद पिकाची पेरणी झाली असून, भुईमूग, खुरासनी, सोयाबीन आदींच्या पेरण्या झाल्या आहेत.

यंदा उशिराने का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे स्वरूप, उपलबध पाणीसाठा यावर अवलंबून असलेल्या शेतीवर मोठा विपरीत परिणाम होत आहे.

तालुका कृषी विभागाने या वर्षीही चारसूत्री भात तंत्रज्ञानाचा अवलंब केला. पीकपद्धती, खते, सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती करण्यात आली. या वर्षी तालुक्यातील खेड, वासाळी, बारशिंगवे, मांजरगाव, खडकेद आदी गावांमध्ये भात लागवडीबरोबरच नागली, सोयाबीन आदी पिकांची लागवड झाली आहे.

शेतकऱ्यांनी इंद्रायणी, फुले, समृद्धी, एक हजार आठ, सोनम, रूपाली, ओम ३, पूजा, आर चोवीस, ज्ञानेश्वरी या जातीची भाताची लागवड केली आहे. युरिया, इफको, महाधन, सम्राट, सुफला, अमोनिया, सुफर फॉरेस्ट आदी रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आल्याचे तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

तालुक्यात नागली पिकाखालील क्षेत्रात मजगीची मोठ्या प्रमाणात कामे झाल्यामुळे तालुक्यात या पिकाचे क्षेत्र कमी होऊन भातलागवडीला शेतकरी पसंती देत आहेत. सोयाबीन,भुईमूग ही पिके प्राथमिक वाढीच्या अवस्थेत असून, शेतकऱ्यांनी शेतात निंदणी सुरू केली आहे.

Paddy fields flourished due to satisfactory rainfall in the taluk.
Nashik News: ग्रामपंचायत सदस्य, कर्मचऱ्याला कोंडले! पाणीटंचाईमुळे निमगाव मढ येथे महिलांचा हंडा मोर्चा

"कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नव्या कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून तालुक्यात सधन भातलागवडीत चारसूत्री पद्धतीचा अवलंब केला आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेले भात पीकवाढीची व फुलोऱ्याची अवस्था सध्या निरोगी आहे. यंदा पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांनी संरक्षित पाण्याचा अधिकाधिक वापर करावा."

-रामदास मडके, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी

अशी झाली पिकनिहाय पेरणी :

पिकाचे नाव : पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये

भात : २९ हजार ७१०

नागली : ९७८

वरई : ९६४

खुरासणी : ५३

भुईमूग : १००

मका : २९

उडीद : २४

इतर तृणधान्ये : ५८

ऊस : १३५

सोयाबीन : ३९२

टोमॅटो : २०९

वांगी : २२

कोबी : ३२

-------------------------

एकूण लागवडीखाली आलेले क्षेत्र : ३२ हजार ९०५ हेक्टर

Paddy fields flourished due to satisfactory rainfall in the taluk.
Nashik Tomato Rate Fall: टोमॅटोच्या 3 लाख क्रेटची आवक; पिंपळगाव बाजार समितीत भावात घसरण सुरूच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com