Nashik Crime : सायखेडा पोलिसांनी 13 जनावरे पकडली

crime news
crime newssakal

Nashik Crime News : सायखेडा पोलिसांनी काही दिवसांपासून अवैध दारू, गुटखा, जुगाराविरुद्ध कारवाया सुरू केल्या असून, सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. (Saikheda police caught 13 animals nashik crime news)

सायखेडा पोलिसांना वऱ्हेदारणा शिवारातील परिसरातून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी छापा टाकत १३ जनावरांची सुटका केली.

पोलिसांनी इमान राजाभाई पठाण (वय ४२, रा. वऱ्हेदारणा, ता. निफाड) यास अटक केली. जनावरांना तपोवन (नाशिक) येथील पांजरापोळ येथे जमा करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime news
Nashik Crime : 'त्या' प्रकरणातील 7 संशयित ताब्यात

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी. हवालदार भगवान कर्डक, विकास गिते, मोठाभाऊ जाधव, पवन निकम, प्रकाश वाकळे, महिला पोलीस ऊर्मिला बिष्ट, मदन कहांडळ आदींनी केली.

सायखेडा पोलिस ठाण्यांतर्गत अवैध धंद्याविरुद्ध कारवाई तीव्र केली असून, यापुढे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही केली जाईल, असे सायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्य निरीक्षक पी. वाय कादरी यांनी सांगितले.

crime news
Nashik Crime News : 4 लाखांचे सोन्याचे दागिने बसस्थानकातून लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com