तक्रारी कमी, पण मागणीच्या तुलनेत रेमडेसिव्हिरचा तुटवडा कायमच

शहर-जिल्ह्यात रेमडेसिव्हिर(Remdesivir) इंजेक्शनबाबत तक्रारी कमी झाल्या असल्या तरी वितरणात तूट मात्र कायमच आहे.
Remdesivir
Remdesivire-sakal

नाशिक : शहर-जिल्ह्यात रेमडेसिव्हिर(Remdesivir) इंजेक्शनबाबत तक्रारी कमी झाल्या असल्या तरी वितरणात तूट मात्र कायमच आहे. जिल्ह्यासाठी सरासरी आठ हजारांच्या आसपास कोरोनाबाधितांसाठी(covid patients) त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून शिफारस होत असली तरी, त्याच्या चाळीस टक्क्यांच्या आसपासच इंजेक्शन(Injection) उपलब्ध होत आहे. (The shortage of Remdesivir injection remain constant)

मागणीच्या तुलनेत रेमडेसिव्हिरचा तुटवडाच

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मागणीच्या प्रमाणात उपलब्धता कमी असल्याने ही तूट भरून काढण्यासाठी वितरणात अधिक काटेकोरपणा आणला जात आहे. शहर-जिल्ह्यातील सगळा रेमडेसिव्हिरचा साठा शुक्रवारी शहरातील २३७ खासगी रुग्णालयांशिवाय महापालिका, जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांना पुरविला जात आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या पाच हजार १३३ रुग्‍णांपैकी दोन हजार २४१ रुग्णांना इंजेक्शनचे वाटप करण्यात आले. मागणीच्या प्रमाणात उपलब्ध होणारा चाळीस ते पन्नास टक्के साठा जिल्ह्यातील सव्वादोनशे ते अडीचशे रुग्णालयांना उपलब्ध करून देताना यंत्रणेची भंबेरी उडत आहे. रोज नवनवे नियम लावून वितरण सुरू आहे. रुग्णांची स्थिती(condition), त्यांची प्राणवायूची पातळी(SpO2), एचआरसीटी(HR-CT) आदी बाबी तपासून इंजेक्शनचे वितरण सुरू आहे. मात्र आता वितरित झालेले इंजेक्शन ठराविक वेळेत नेण्याचा नियम कालपासून लागू केला आहे. दोन दिवसांनंतर विलंब केल्यास तेही आता मिळण्याची शक्यता राहिलेली नाही.

Remdesivir
शेतकरी विकतोय दिवसाला चारशे लिटर दूध

दोन दिवसांत वितरण

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वितरण करताना संबंधित रुग्णालयांनी त्यांच्या नेमून दिलेल्या औषध विक्रेत्यांकडून इंजेक्शन न घेतल्यास, दोन दिवसांनंतर संबंधित इंजेक्शन पुनर्वितरणासाठी घेतला जाईल, असे जिल्हा यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इंजेक्शन वितरणासाठी रुग्णालयांनी प्राधिकार पत्रासह विक्रेत्यांकडे औषधासाठी नोंदणी करावी. ऑक्सिजन बेडच्या संख्येबाबत त्या त्या वेळी प्रशासकीय यंत्रणेच्या संर्पकात राहून बदलांची माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.

Remdesivir
दरवाढीमुळे पेट्रोलने पुन्हा ओलांडली शंभरी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com