Chandrashekhar Bawankule: जो आमच्या सोबत, त्याला दुप्पट : चंद्रशेखर बावनकुळे

chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankuleesakal

Chandrashekhar Bawankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वोत्तम भारत निर्माण करायचा आहे. सत्तेच्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहेत. जे एकेकाळी आम्हाला साथ देण्यास तयार नव्हते, त्यातील काही आता साथ द्यायला तयार झाल्याने त्यांना आम्ही सोबत घेतले आहे.

जो आमच्या सोबत यायला तयार आहे, त्यांना दुप्पट द्यायला तयार आहे. काँग्रेसचे लोक भारतीय जनता पक्षात आले तर त्यांना घेऊन पक्ष वाढवू, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. (Statement by Chandrasekhar Bawankule at Janata Melawa Media interaction nashik news)

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधील सिकर येथून देशभरातील किसान समृद्धी केंद्राचे उद्‌घाटन आणि पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता वितरित करण्यात आला. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा घेण्यात आला.

त्या वेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की सत्ता भाजपसाठी साध्य नाही. जो कार्यकर्ता पदावर असतो, तो ती सत्ता समाजासाठी वापरतो. उद्धव ठाकरे यांनी सत्ता त्यांच्या घरापुरती वापरली.

उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचे आयुष्य मंगलमय राहो; परंतु वाढदिवशीही त्यांनी विश्वगुरू मोदी यांच्याबद्दल चुकीची विधाने केली. लोकांना विकासकामे हवी आहेत.

काँग्रेसच्या काळातील ६० वर्षे व भाजपच्या सत्ताकाळातील नऊ वर्षांतील कामांचा फरक आता दिसत आहे. केंद्र सरकारविरोधात हिंमत असेल तर अविश्वास आणून दाखवावा, असे आव्हान देताना संसदेत आधी चर्चा पूर्ण करावी लागते, त्यानंतर पंतप्रधान उत्तर देतात. पहिले पंतप्रधानांनी बोलावे, ही मागणी चुकीची असल्याचे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

chandrashekhar bawankule
Sharad Pawar News: अजित पवारांच्या बंडानंतर BJP ला शह देण्यासाठी शरद पवारांचे रेडी आहेत 3 मास्टरप्लॅन

निवडणुकांबाबत चुकीचे नरेटिव्ह

महाविकास आघाडीचे सरकार असताना चुका करून ठेवल्या, त्या चुका महायुतीकडून दुरुस्त केल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील.

निवडणुका भाजपने थांबविल्या नाहीत. विरोधक चुकीचे नरेटिव्ह सेट करीत आहेत. भाजपकडून निवडणुका थांबलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे निवडणुकीसंदर्भात चुकीचे बोलत आहेत. त्यांना स्मृतिभ्रंश झाला, त्याला अल्झायमर म्हणतात, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आमदार नियुक्तीचा ‘फॉर्म्युला’

राज्यपाल नियुक्त १२ आमदार नियुक्त केले जाणार आहेत; परंतु आमदार नियुक्तीचा अद्याप कुठलाच ‘फॉर्म्युला’ ठरलेला नाही. महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांच्या प्रत्येकी चार नेत्यांच्या समन्वय समितीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीत कोणताही ‘फॉर्म्युला’ ठरलेला नाही.

chandrashekhar bawankule
Nashik NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com