Nashik News : चॉकलेटमुळे जगप्रसिद्ध असलेल्या रावळगावात युवकांचा अभिनव उपक्रम! या समस्येचे बनले उत्तर...

students of class 10th Started making vaikunth rath nashik news
students of class 10th Started making vaikunth rath nashik newsesakal

Nashik News : रावळगाव (ता. मालेगाव) येथील रावळगाव इंग्लिश स्कूलच्या १९९८ मधील दहावीतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत गावासाठी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

चॉकलेटमुळे जगप्रसिद्ध असलेल्या रावळगावात वैकुंठरथ नसणे ही मोठी शोकांतिका आहे. गावाचा विस्तार वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी मालेगाव येथून विविध संस्था, संघटनांचे वैकुंठरथ मागविले जातात. (students of class 10th Started making vaikunth rath nashik news)

यात गावातील कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी लागणारे फुले म्हणून गोवऱ्या पुरविणार असून याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून गावाला प्रतिक्षा असलेला वैकुंठरथ देखील ते कार्यान्वित करणार आहेत. युवकांच्या या उपक्रमाचे गाव व परिसरात कौतुक केले जात आहे.

गेल्या अनेक वर्षापासून वैकुंठ रथाच्या गावाच्या मागणीला १९९८ मधील दहावीच्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आकार दिला आहे. एका आठवड्यापासून रथ बनविण्यास सुरवात झाली आहे. महिनाभरात तो गावाच्या सेवेत दाखल होईल. वैकुंठ रथामुळे स्मशानभूमी पासून लांब अंतरावर राहणाऱ्यांची सोय होणार आहे.

गाव व परिसरात ७० टक्के नागरिक गरीब व मध्यमवर्गीय आहेत. या कुटुंबीयांसह गाव व परिसरातील सर्व कुटुंबीयांसाठी युवकांनी अभिनव उपक्रम हाती घेतला. गावात कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी फुले (गोवऱ्या) मोफत देण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

students of class 10th Started making vaikunth rath nashik news
Nashik News : ‘क्रोशा आर्ट’ माध्यमातून स्त्री- पुरुष समानतेचा संदेश; 30 बाय 45 इंच लोकरीचा राष्ट्रीय ध्वज

त्यासाठी लागणाऱ्या गोवऱ्या यांची व्यवस्था देखील करण्यात आली असून आवश्‍यकतेनुसार त्या मागविल्या जाणार आहेत. वैकुंठरथ व अंत्यसंस्कारासाठीच्या गोवऱ्यांचा खर्च देखील युवक उचलणार आहेत.

ज्या गावात बालपण व शालेय जीवन घालविले त्या गावासाठी काहीतरी करण्याचा त्यांचा उद्देश आहे. १९९८ मधील हे सवंगडी आजमितीस विविध ठिकाणी नोकरी, व्यवसायात कार्यरत आहेत.

काही जण उच्च पदावरदेखील आहेत. तुफान चव्हाण, सचिन देसाई, संदीप मिटकरी, दिलीप खांडेकर, दीपक अहिरे, चंद्रशेखर वाघ, नितीन आखाडे, समाधान मार्तंड, राजेंद्र पठाडे, मिलिंद निमगुळकर, रुद्रेश पाटील, पंकज माळवाळ, अनिल खरे, उल्हास चौधरी, भास्कर शिरसाठ, मयूर कुलकर्णी, तुषार सोनजे, वर्षा पाटील, उज्ज्वला राजधर, छाया माळवाळ, विद्या संसारे, वंदना धाबळे, भारती मोरे, योगिता वळांजू आदी सवंगडी आपापल्या परीने मदत देवून हा उपक्रम यशस्वी करणार आहेत. युवकांचा हा उपक्रम गावासाठी मैलाचा दगड ठरणार असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

students of class 10th Started making vaikunth rath nashik news
Rakshabandhan 2023 : डिजिटल युगातही टपालाचे महत्त्व कायम! भाऊरायापर्यंत राखी पोचवण्यासाठी बहिणींकडून पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com