अपंगत्वावर मात करत त्याने मिळवला MBBS ला प्रवेश

Felicitation
Felicitationesakal

पंचवटी (जि.नाशिक) : असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे गुरू ठाकूर (Guru Thakur) आपल्या ‘उत्तर’ कवितेत म्हणतात. वरील ओळी ज्याच्या संघर्षाला तंतोतंत लागू होतात. अशा एका दिव्यांग विद्यार्थ्यांची ही संघर्षपूर्ण कहाणी. मूळची चिकाटी, तिला कोचिंग क्लासच्या शिक्षकाने दिलेले पाठबळ. यामुळे विकलांगतेवर मात करत सर्वसामान्य घरात जन्मलेल्या रोहितला नुकताच एमबीबीएसला प्रवेश मिळाला.

Felicitation
Medical Admission: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसरी फेरी सुरू

शहरातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेला रोहित बाळासाहेब ठोंबरे हा जन्मतःच अपंग. आठवीला गेल्यावर तो ज्ञानदीप कोचिंग क्लासेसमध्ये (Coaching Classe) प्रवेश घेण्यासाठी आला तेव्हा तो अभ्यासात जेमतेमच होता. परंतु कष्ट करण्याची तयारी आणि शरीराचे अपंगत्व बघून सरांनी त्याला नाममात्र फी आकारत क्लासमध्ये प्रवेश दिला. रोहितला अभ्यासात ऊर्जा मिळावी म्हणून ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे संचालक दर्शन मालसाने सरांनी त्याला ज्ञानाचे धडे द्यायला सुरवात केली. त्या वेळी त्याच्या अपंगत्वाकडे बघून सरांनी त्याला असे सांगितले की, ‘तुला स्वतःला तुझ्या पायाची शस्त्रक्रिया करायची आहे, आणि त्यासाठी तुला वैद्यकीय क्षेत्रात (Medical Field) पदवी (Degree) मिळवावी लागेल’. बस रोहितने हे मनात पक्के केले आणि जोमाने अभ्यासाला लागला. परंतु, प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असे नाही.

Felicitation
Medical Admission : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ

रोहितला इयत्ता दहावीला (SSC) अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु, तो डगमगून न जाता त्याच ध्येयाने, कष्टाने, जिद्दीने अकरावी आणि बारावी (HSC) या दोन वर्षाचा डोळ्यात तेल घालून अभ्यास केला. जे स्वप्न त्याने पहिले ते स्वप्न त्याने सत्यात उतरविण्याची जिद्द त्याने मनी बाळगली होती. रोहितने नीट परीक्षेत (NEET) घवघवीत यश संपादन करत मुंबईतील राजीव गांधी मेडिकल कॉलेज (Rajiv Gandhi Medical College, Mumbai) येथे एमबीबीएससाठी (MBBS) प्रवेश मिळवला. त्याच्या या मेहनतीचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. ज्ञानदीप कोचिंग क्लासेसने त्याचा सन्मानचिन्ह देऊन नगरसेवक अरुण पवार यांच्या हस्ते गौरव केला.

Felicitation
Success Story डॉक्टर मित्र रमले दूध उद्योगात...

या वेळी रोहितला मोलाचे मार्गदर्शन करणारे क्लासचे संचालक दर्शन मालसाने, चेतन शिंदे, मनीषा गिरासे यांनीही रोहितचे कौतुक केले. अपंगत्वावर मात करत रोहितने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे व त्याच्या पंखात बळ भरणाऱ्या श्री. मालसाने सरांचेही कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com