गुरुजींनी ठरविले तर काहीच अशक्य नाही! शिक्षकांचे कोविड लढ्यात योगदान

‘अशी असावी दातृत्वाची शाळा, माणुसकीला लाविते लळा,
teachers donate the fund
teachers donate the funde-sakal

सुरगाणा (जि. नाशिक) : ‘अशी असावी दातृत्वाची शाळा, माणुसकीला लाविते लळा, संस्कार घडविते तान्हुल्या बाळा’ या ओळी शाळेची आठवण करून तर देतातच पण बालपणीच्या रम्य आठवणीत घेऊन जातात. एरवी ग्रामीण भागात गावठी शाळेतील मास्तर(teacher) हीच काय ती जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची गावस्तरावर असलेली ओळख पुरेशी ठरते. मात्र, याच मास्तरांनी जननिधी जमा करीत सुरगाणा तालुक्यात ३० ऑक्सिजन बेड(oxygen bed) उभारण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. (Teachers donated Rs 7 lakh for the Corona fight)

३० ऑक्सिजन बेडचा सुसज्ज कक्ष साकारणार

मायेच्या ममतेने संस्कार करून शिकवतो तो मास्तर. आईनंतरचे स्थान हे मुलांच्या जीवनात मास्तरलाच असते. आईसारखाच लेकरांना जपणारा ‘मास्तर’ खरेतर अद्वितीयच. पूर्वी शिक्षकाला मास्तर म्हणून आदरातिथ्याने आणि हक्काने गाव कारभारात हाक दिली जात असे. तो काळ बदलत गेला, नंतर सर आले. मास्तरची सर काहीशी फिकी झाली. दर्जा मात्र तोच राहिला. याचीच प्रचीती सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिक्षकांनी आणून देत सामाजिक वसा जपत तालुक्यात कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करत मदतीचा हात पुढे केला. लेकरांचे भविष्य पेरणाऱ्या शिक्षकांना भविष्यात उभे ठाकलेले संकटही कळले. म्हणूनच एकवटलेल्या शिक्षकांनी प्राणवायू देण्यासाठी कोविड जननिधीस मदत करून नवा आदर्श घालून दिला. या निधीतून कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र ३० ऑक्सिजन बेडचा सुसज्ज कक्ष सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आला आहे. याचा लाभ अतिदुर्गम आदिवासी भागातील गुजरात सीमेलगतच्या रुग्णांना होत आहे. याची तालुक्यातील जनतेमध्ये चांगलीच चर्चा होत असून, गुरुजींनी ठरविले तर काहीच अशक्य नाही. कोरोनाशी दोन हात करण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोनाला हद्दपार करण्याचा शिक्षकांनी विडा उचलला असून, शिक्षक रस्त्यावरील चौकीवर नाकाबंदी करीत चौकीदार, रखवालदाराच्या भूमिकेबरोबरच लसीकरण ऑनलाइन नोंदणी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ऐवजी ‘तुमचे कुटुंब, माझी जबाबदारी’चा विडा उचलत घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत.

teachers donate the fund
HR-CT स्कोर 19 त्यात न्युमोनिया; तरीही आजींची कोरोनावर मात!

२५ जम्बो सिलिंडरची खरेदी

सध्याच्या कोरोना महामारीत तालुक्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजन बेडची गरज ओळखून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे हात मदतीकरिता पुढे सरसावले असून, शिक्षकांचे भरीव आर्थिक योगदान व एकजुटीच्या निर्धारातून तातडीने सात लाख ६२ हजार २१६ रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. पैकी चार लाख रकमेतून कोविड रुग्णांकरिता २५ जम्बो सिलिंडर(jumbo cylinder) पुणे येथून खरेदी करण्यात आली. यामधून ३० ऑक्सिजन खाटांची सुविधा निर्माण झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात रुग्णांची सोय झाली आहे. उर्वरित रकमेतून आणखी एक सुसज्ज कक्ष तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन...

उर्वरित निधीतून रुग्णांसाठी इतर उपयुक्त साधने, साहित्य खरेदी करण्यात येत आहे. या बिकट परिस्थितीत तालुक्यातील गरजू रुग्णांना याचा लाभ मिळू शकेल. याकामी शिक्षक समन्वय समितीचे सर्व सदस्य धोका पत्करून प्रयत्न करीत आहेत. रुग्णांना वेळीच मदत केल्याने केवळ ऑक्सिजन खाटा इतरत्र शोधण्याकरिता होणारी धावपळ थांबली आहे. इतर खात्यातील कर्मचाऱ्यांबरोबरच समाजातील दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन शिक्षकांकडून करण्यात आले आहे.

teachers donate the fund
विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य वर आग

नेट बँकिंगच्या माध्यमातून चार दिवसांत निधी संकलित

निधी संकलनासाठी तहसीलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, कल्पेश भोये, सुरेश पांडोले, विस्ताराधिकारी संजय कुसाळकर, दिलीप नाईकवाडे, नरेंद्र कचवे, सुमन भरसट, डॉ. नेहा शिरोरे, प्रमिला शेंडगे, बाबूराव महाले, भाऊसाहेब सरक, मंदोदरी पाटील यांनी पुढाकार घेतला. हरिश्‍चंद्र गावित, राजकुमार चौधरी, हरिराम गावित, जयराम चव्हाण, भास्कर झिरवाळ, सुनील अलबाड, संजय पवार, देवीदास देशमुख, गणेश गायकवाड, दीपक पवार, हरिराम गायकवाड, सचिन राजपूत, केशव महाले, प्रताप देशमुख, रवींद्र गायकवाड, यशवंत देशमुख, संजय गवळी, राजेंद्र गावित, तुळशीराम देशमुख, दिगंबर चौधरी, भास्कर बागूल, कृष्णा देशमुख, मनोज पवार आदींनी निधी संकलनाकरिता नेट बँकिंगच्या(net banking) माध्यमातून विशेष परिश्रम घेऊन अवघ्या चार दिवसांत निधी संकलित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com