कोरोनामुळे जगभरात घडताएत कधीही न घडलेल्या गोष्टी!..काय आहेत त्या...

corona worldwide.jpg
corona worldwide.jpg

भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देशातून सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. आणीबाणी सारखी परिस्थिती उद्भवल्यामुळेच कदाचित जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे 

अशा आहेत कधीही न घडलेल्या गोष्टी...

-भारतात आतापर्यंत १ लाख ४० हजार लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. कोरोनाच्या वर्ल्डोमीटरवर ही माहिती आहे. म्हणजे १० लाख लोकांमध्ये १०२ लोकांच्या चाचण्यात झाल्या आहेत. तर पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ३५ हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यानंतर जपानमध्येही ४४ हजार चाचण्या केल्या गेल्या आहेत.

------------------------------------

- पाकिस्तानच्या पंजाब राज्यात तब्लिगी जमातीचे ३०० हून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. याआधी पाकिस्तानच्या सिंध राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त होते. मात्र आता पंजाबमध्ये सर्वात जास्त कोरोनारुग्णांची नोंद झालीय. पंजाबमध्ये फक्त २४ तासात नवे १८४ कोरोनारुग्ण सापडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्येही १४ कोरोनाग्रस्त आहेत.

-----------------

-सरकारचा नियम न पाळल्यामुळे पाकिस्तानात एका मौलानासह ६ जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पाकिस्तान टूडेनं ही बातमी दिलीय. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नमाज पठण बंद करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. मात्र ते आदेश झुगारुन त्यांनी नमाजाचं आवाहन केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.

----------------------------------------------

-अमेरिकेला चीननं १ हजार व्हेंटिलेटर्स दान केले आहेत. न्यूयॉर्क शहरासाठी हे सर्व व्हेंटिलेटर वापरले जाणार आहेत. सीएनबीसीनं ही बातमी दिलीय. न्यूयॉर्कच्या महापौरांच्या दाव्यानुसार तिथल्या स्थानिक प्रशासनानं सरकारकडे अजून १७ हजार व्हेंटिलेटर्सची गरज असल्याचं म्हटलंय.

----------------------------------

- रशियात एका तरुणानं खिडकीतून रस्त्यावरच्या ५ लोकांवर गोळ्या झाडल्या आहेत. यात एका महिलेसह पाचही लोकांचा मृत्यू झाला. ज्या भागात ही घटना घडली, त्या भागात कोरोनामुळे कुणालाही बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले होते. हे पाचही लोक घराबाहेर पडून जोरानं बोलत असल्यामुळे त्यांना गोळ्या मारल्याचा दावा आरोपी तरुणानं केलाय.

--------------------------------------

- दक्षिण अफ्रिकेत एका मुस्लिम धर्मगुरुंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दाव्यानुसार मृत मुस्लिम धर्मगुरु नुकतेच दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दक्षिण अफ्रिकेत आतापर्यंत १६५५ लोक कोरोनाग्रस्त आहेत आणि ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. २००८ च्या आकडेवारीनुसार दक्षिण अफ्रिकेची लोकसंख्या ५ कोटींच्या आसपास आहे.

------------------------------------------

-कोरोनामुळे जपान सुद्धा लवकरच आणीबाणी घोषित करण्याच्या तयारीत आहे. जपानमध्ये साडेतीन हजारांहून जास्त लोकांना कोरोना झालाय. स्थानिक प्रशासनाकडून शिन्जो आबे यांच्यावर दबाव वाढत असल्यामुळे ते लवकर आणीबाणी घोषित करतील, अशी शक्यता वर्तवली गेलीय. जर अजून उशीर झाला, तर तिथल्या आरोग्य यंत्रणेपुढे अडचणी वाढण्याची शक्यता तिथल्या जाणकारांनी व्यक्त केली आहे.

-----------------------------------------

-फ्रान्स कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आलाय. फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ९२ हजारांवर पोहोचलाय. तिथं २४ तासात ४४१ लोकांचा मृत्यू झालाय.

--------------------------------

-स्कॉटलंडमध्ये चीफ मेडिकल ऑफिसरला लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. कैथरीन कैल्डरवुड असं त्यांचं नाव आहे. आपल्या घरातून त्या फक्त शेजारच्या घरी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्याबाबत क्षमाही मागितली. मात्र सरकारनं त्यांना तातडीनं राजीनामा देण्याचे आदेश दिले.

-------------------------------------

- ब्राझिलमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ११ हजारांच्या वर गेला आहे. विशेष म्हणजे तिथल्या राष्ट्रपतींची कोरोनाबाबतची बेफिकीरी याआधीच चर्चेचा विषय ठरलीय. कोरोनासारखे आजार येतच असतात, मात्र त्यामुळे अर्थव्यवस्था धोक्यात टाकता येणार नाही, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. ब्राझिलमध्ये आतापर्यंत ४८७ लोकांचा मृत्यूही झालाय.

-स्पेनमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३१ हजारांच्या वर गेलाय. मागच्या २४ तासात तिथं ८०९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. स्पेनच्या पंतप्रधानांनी याआधीच २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे.

------------------------------------------------

-इटलीतही पहिल्यांदाच कोरोनामुळे मृतांचा आकडा कमी झालाय. त्याचबरोबर नव्यानं कोरोनाबाधित होणाऱ्यांच्या संख्येतही घट होतेय. त्यासोबतच थेट अतिदक्षता विभागात दाखल करावं लागणाऱ्यांची संख्याही कमी झाल्यामुळे इतर आवश्यक रुग्णांना व्हेंटिलेटर्स दिले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com