Nashik 11th Admission : अकरावीचा कट ऑफ नव्वदीपार! 4 हजार 799 विद्यार्थ्यांना कुठलीच संधी नाही

11th std admission process
11th std admission processsakal

Nashik 11th Admission : इयत्ता अकरावीच्‍या प्रवेशासाठी तिसरी निवडयादी बुधवारी (ता. १२) प्रसिद्ध झाली असून, या फेरीतील विज्ञान शाखेचा कट ऑफ नव्वद टक्क्‍यांपेक्षा अधिक नोंदविला आहे.

पहिल्‍या दोन फेऱ्यांमध्ये कट ऑफ खालावलेला असताना नामांकित महाविद्यालयातील रिक्‍त जागांच्‍या तुलनेत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक राहिल्‍याने कट ऑफने उसळी घेतल्‍याचे बोलले जाते आहे.

आरवायके, नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयासह केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेचा अनुदानित जागेचा कट ऑफ उंचावला आहे. (Third selection list for Class 11th admission released on 12 july nashik news)

नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी पहिल्‍या यादीतील कट ऑफ ८९ टक्क्‍याच्‍या सुमारास नोंदविला होता. दुसऱ्या यादीत घसरण होऊन कट ऑफ ८५ ते ८६ टक्क्‍यांवर आला होता.

नामांकित महाविद्यालयात पहिल्‍या दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश झालेले असल्‍याने रिक्‍त जागांची संख्या मर्यादित आहे. दुसरीकडे प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांची संख्या अधिक राहिल्‍याने तिसऱ्या फेरीतील कट ऑफ वाढल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. प्रवेशप्रक्रियेच्‍या अंतिम टप्प्‍यात विज्ञान शाखेत अनुदानित जागेसाठीचा कट ऑफ नव्वदीपार गेला आहे.

वाणिज्‍यला बीवायकेचा कट ऑफ ९४.६ टक्‍के, कला शाखेचा एचपीटी महाविद्यालयात खुल्‍या प्रवर्गासाठीचा कट ऑफ ७३ टक्‍के राहिला. तर केटीएचएमचा ७१.८ टक्‍के आहे. दरम्‍यान दुसऱ्या फेरीप्रमाणे तिसऱ्या फेरीतही बीवायकेचा कट ऑफ हा विज्ञान शाखेच्‍या टक्‍केवारीपेक्षा अधिक राहिला आहे.

इंग्रजी माध्यम अनुदानित जागेसाठी महाविद्यालयात खुल्‍या प्रवर्गाचा कट ऑफ ९४.६ टक्‍के राहिला आहे. अन्‍य महाविद्यालयांत वाणिज्‍यचा कट ऑफ ८४ ते ८५ टक्‍के राहिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

11th std admission process
Career Selection : पालकांनो मुलांनाच ठरवू द्या भविष्याची दिशा; अन्यथा होईल दुर्दशा...!

४ हजार ७९९ विद्यार्थ्यांना कुठलीच संधी नाही

अकरावीच्‍या १३ हजार ४०२ रिक्‍त जागा उपलब्‍ध असताना आठ हजार ५८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातून तीन हजार ७८१ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर उर्वरित चार हजार ७९९ विद्यार्थ्यांना त्‍यांनी नोंदविलेल्‍या पसंतीक्रमापैकी कुठल्‍याही महाविद्यालयासाठी निवड करण्यात आलेली नाही.

निवड झालेल्‍यांमध्ये सर्वाधिक एक हजार ८४७ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या पसंतीचे ७६६, तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या ४७६ आहे.

शाखानिहाय निवड झालेले विद्यार्थी

शाखा उपलब्‍ध जागा अर्जदार विद्यार्थी निवड झालेले विद्यार्थी

विज्ञान ५,२७१ ४,७८२ २,११६

वाणिज्‍य ४,४०७ २,१८३ १,०२३

कला २,९३१ १,४८८ ५५७

11th std admission process
Career Selection : असे निवडा करिअर...

महाविद्यालयनिहाय विज्ञान शाखेचा कट ऑफ असा

(अनुदानित इंग्रजी माध्यम जागेसाठी, टक्‍केवारीत)

महाविद्यालय कट ऑफ

आरवायके ९०.६

केटीएचएम ९०.४

नाशिक रोड, बिटको ९०.२

हिरे महाविद्यालय ८६.८

केएसकेडब्‍ल्‍यू ८९.२

भोसला सैनिकी ८७.८

नाईक (विनाअनुदानित) ८९

11th std admission process
Career Selection : असे निवडा करिअर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com