Nashik Crime News : चोंढी पोमनारवाडीत सामाईक बांधाच्या वादातून तरुणाचा फाशी देवून खून?

Youth hanged in chondi Pomnar Wadi due to communal dam dispute nashik crime news
Youth hanged in chondi Pomnar Wadi due to communal dam dispute nashik crime newsesakal

Nashik Crime News : चोंढी (ता. मालेगाव) येथील पोमनारवाडी येथे सामाईक बांधाच्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत व तरुणाचा फाशी देवून खून करण्यात झाले. या वादात संतोष जिभाऊ पोमनार (वय ३६, रा. चोंढी) या तरुणाचा बळी गेला.

संतोषच्या गळ्यात आठ संशयितांनी मिळून दोराचे चराट टाकून त्यास फाशी देत त्याचा खून केला. रविवारी (ता. ३) साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. (Youth hanged in chondi Pomnar Wadi due to communal dam dispute nashik crime news)

संतोष पोमनारच्या कुटुंबियांनी संतोष अंत्यवस्थ असल्याचे समजून त्याला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र मगर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

तालुका पोलिस ठाण्यात महिलेसह आठ जणांविरुध्द खूनाचा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मयत संतोषचा भाऊ शरद जिभाऊ पोमनार (वय ४५, रा. पोमनारवाडी, चोंढी) यांनी तक्रार दिली आहे.

कैलास राऊतराय, त्यांचा भाऊ संतोष राऊतराय (रा. मुखेड, ता. येवला) तसेच समाधान पोमनार, संजय पोमनार, सुभाष पोमनार, शिवाजी पोमनार, सागर पोमनार यांनी एका महिलेसह शेतातील सामाईक बांधाच्या वादातून कुरापत काढून संतोषला त्याच्या घरात जाऊन धक्काबुक्की केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Youth hanged in chondi Pomnar Wadi due to communal dam dispute nashik crime news
Nashik Cidco Crime : सोशल मीडिया पोस्ट बनली सिडकोतील 'त्या' युवकाच्या हत्येचे कारण...

महिलेने चप्पलेने मारहाण केली. संतोष व शरदच्या आईला मारहाण करत तिचा विनयभंग करण्यात आला. दोघांनी लाथा बुक्क्यांनी पाेटात जबर मारहाण केली. या वादातच संशयितांनी संतोषच्या गळ्यात दोराचे चराट टाकून फाशी देत त्याचा खून केला.

दरम्यान या खून प्रकरणी गाव व परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. पोलिसांनी खून, दंगल, विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत असून निरीक्षक मगर तपास करीत आहेत.

Youth hanged in chondi Pomnar Wadi due to communal dam dispute nashik crime news
Nashik Cidco Crime : सिडकोत भरदिवसा खून करणाऱ्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल; कॉलेजरोडला एकाला बेदम मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com