Nashik News: जिल्ह्यात ग्रामसचिवालयांसाठी आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये रस्सीखेच; 8 प्रस्ताव प्राप्त

Nashik ZP News
Nashik ZP News esakal

Nashik News : देशाच्या अमृत महोत्सावानिमित्त लोकोपयोगी उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी दोन ग्रामसचिवालये उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ तालुक्यांमधून आठ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

यात विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातील सौंदाणे, तर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यातील नगरसूलचा प्रस्ताव आहे.

त्यामुळे ग्रामसचिवालये आपल्या तालुक्यात आणण्यासाठी आता आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. (Zilla Parishad Gram Panchayat Department received 8 proposals For Gram Secretariat nashik news)

देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त लोकोपयोगी उपक्रमांतर्गत राज्यातील ७५ गावांमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण ७५ ग्रामसचिवालये उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी दोन ग्रामसचिवालये मंजूर आहेत. (स्व.) बाळासाहेब ठाकरे स्मृती-मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत १८ लाख आणि राज्य शासनाकडून ३२ लाख अशी एकूण

प्रत्येकी ५० लाख रुपये रक्कम मिळणार आहे. यातून ग्रामसचिवालयात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यात वेगवान इंटरनेट सुविधा, आपले सरकार सेवा केंद्र, बँक, एटीएम तसेच पूर्णपणे सोलर ऊर्जेचा वापरही त्यात अंतर्भूत आहे. ग्रामसचिवालय निवडीचे जास्त लोकसंख्या असूनही ज्या ग्रामपंचायतीचे कार्यालय सुस्थितीत नाही, अशाच ग्रामपंचायतीची निवड करण्यात यावी.

Nashik ZP News
Manoj Jarange आणि Chhagan Bhujbal यांनी एकत्र यावं? Sushma Andhare असं का म्हणाल्या?

त्याचे नियंत्रण, मालकी ग्रामपंचायतीचीच राहणार असून, देखभाल, दुरुस्तीचीही जबाबदारी भविष्यात त्यांचीच राहणार आहे, असे निकष आहेत. त्यासाठी जिल्ह्यातून आठ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नियमाची पूर्तता होणाऱ्या गावात आता ग्रामसचिवालयाची उभारणी होणार आहे. मात्र, अद्याप त्यासाठीची गावे निश्चित झालेली नाहीत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ‘नमो ग्रामसचिवालय’ उभारणीचे आलेले प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले जातील. यात निकषानुसार गावांची निवड होणार आहे. त्यामुळे यात कोणत्या तालुक्यात ग्रामसचिवालये जातात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्राप्त झालेले प्रस्ताव

सौंदाणे (ता. मालेगाव), नगरसूल (ता. येवला), गिरणारे (ता. नाशिक), ताहराबाद (ता. बागलाण), पिंपळगाव बसवंत (ता. निफाड), अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर), गोंदे (ता. इगतपुरी), मनेगाव (ता. सिन्नर)

Nashik ZP News
Jayakwadi Dam: गंगापूर, कडवा, मुकणेचे पाणी आज जायकवाडीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com