#OnionPrice : कांदा आगारात दरामध्ये यू-टर्न...कसा तो पाहा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

पंधरा हजार, अकरा हजार अशी घसरण होत असताना मंगळवारी (ता. 10) साडेनऊ हजार रुपये भाव मिळाला होता. बुधवारी येथे दहा हजार रुपये या भावाने शेतकऱ्यांनी कांदा विकला. क्विंटलला मुंबईत दहा हजार, नागपूरला सहा हजार व औरंगाबादमध्ये साडेपाच हजार रुपये, असा स्थिर भाव राहिला. पुण्यात अकरा हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला जात असताना शेतकऱ्यांना बुधवारी नऊ हजारांवर समाधान मानावे लागले.

नाशिक : पुणे, भुवनेश्‍वर, कोलकता व पाटणा अशा देशाच्या विविध बाजारपेठांत कांद्याचे भाव घसरले असताना, बुधवारी (ता. 11) कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात भावात सर्वसाधारणपणे एक हजार रुपयांची वृद्धी झाली. 110 रुपये किलोचा भाव साठ रुपयांपर्यंत कमी झालेला असताना पिंपळगावमध्ये 90, लासलगावला 73 रुपये, असा भाव शेतकऱ्यांना मिळाला. 
सोलापूरमध्ये वीस हजार रुपयांपर्यंत क्विंटलचा भाव पोचला होता. तो पंधरा हजार, अकरा हजार अशी घसरण होत असताना मंगळवारी (ता. 10) साडेनऊ हजार रुपये भाव मिळाला होता. बुधवारी येथे दहा हजार रुपये या भावाने शेतकऱ्यांनी कांदा विकला. क्विंटलला मुंबईत दहा हजार, नागपूरला सहा हजार व औरंगाबादमध्ये साडेपाच हजार रुपये, असा स्थिर भाव राहिला. पुण्यात अकरा हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला जात असताना शेतकऱ्यांना बुधवारी नऊ हजारांवर समाधान मानावे लागले.

क्विंटलमागे हजार रुपयांची उसळी 

बेंगळुरूमध्ये दहा हजार आणि अल्वरमध्ये सात हजार 250 रुपये क्विंटलला भाव निघाला. मंगळवारी लासलगावला 7 हजार 800 रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला असताना, बुधवारी भावात घसरण झाली आणि कांद्याला सात हजार 252 रुपये भाव मिळाला. पिंपळगावमध्ये मात्र दीड हजाराने भाव वाढले. बुधवारी नऊ हजार रुपये क्विंटल असा भाव निघाला. चेन्नईत दहा हजार रुपये असा भाव स्थिर राहिलेला असताना पाचशे रुपयांनी भुवनेश्‍वर, कोलकता, पाटणा येथे भाव घसरले होते. भुवनेश्‍वरमध्ये 8 हजार, कोलकत्यात 8 हजार 500, तर पाटण्यात आठ हजार रुपये क्विंटल असा भाव होता. 

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे भाव 
(आकडे क्विंटलमागे रुपयांत) 

बाजारपेठ बुधवारचा (ता. 11) भाव मंगळवारचा (ता. 10) भाव 
देवळा 7 हजार 6 हजार 105 
मनमाड 6 हजार 5 हजार 400 
येवला 6 हजार 551 5 हजार 801 
चांदवड 7 हजार 770 6 हजार 201 
मुंगसे 7 हजार 400 5 हजार 950 
उमराणे 8 हजार 700 5 हजार 555 

हेही वाचा > PHOTO : ऍपलचे शोरूम फोडले...सुरक्षारक्षकांचा वावर असूनही 'अशी' केली चोरांनी हिम्मत..

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion prices News Nashik Marathi News