esakal | VIDEO : पानिपत ते नाशिक चक्क सायकलवर?..ध्येयवेडे करणार 'यासाठी' प्रवास!
sakal

बोलून बातमी शोधा

panipat to nashik.jpg

14 जानेवारी 1761 साली पानिपतचे तिसरे महायुद्ध झाले . या महायुद्ध मध्ये अहमदशहा अब्दाली व मराठे यांच्यात जोरदार झुंज झाली या झुंजीत एक लाख मराठे शहीद झाले होते. यात अठरापगड जाती मधील महाराष्ट्रातल्या जनतेचे वंशज धारातीर्थी पडले होते. या घटनेला 14 जानेवारी 2020 ला 260 वर्षे पूर्ण होत आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या पूर्वजांच्या स्मृती जागवण्यासाठी नाशिकच्या 'टीम पाणिपत' या ग्रुपने असा संकल्प करायचे ठरवले आहे.

VIDEO : पानिपत ते नाशिक चक्क सायकलवर?..ध्येयवेडे करणार 'यासाठी' प्रवास!

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक मधील काही ध्येयवेडे सायकलिस्टनी ऐतिहासिक मोहीम हाती घेतली असून पानिपत ते नाशिक हा साडे चौदाशे किलोमीटरचा प्रवास आठ मुक्काम आणि नऊ दिवसात पूर्ण करणार आहे. 14 जानेवारी 1761 साली पानिपतच्या युद्धात जवळपास एक लाख मराठा सैनिक धारातीर्थी पडले होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 14 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान नाशिकचे 36 सायकलपटू आणि इतिहास संशोधक शूर वीरांच्या स्मृती जागवण्यासाठी पानिपत ते नाशिक हा तीन राज्यांचा प्रवास करणार आहे. यात वयाच्या 31 वर्षापासून ते 75 वर्षा पर्यंतचे ज्येष्ठ नागरिक हा आव्हानात्मक सायकल प्रवास करणार असल्याची माहिती या मोहिमेचे समन्वयक डॉ आबा पाटील यांनी सकाळला दिली.

तर यासाठी करणार ते इतका मोठा प्रवास...

14 जानेवारी 1761 साली पानिपतचे तिसरे महायुद्ध झाले . या महायुद्ध मध्ये अहमदशहा अब्दाली व मराठे यांच्यात जोरदार झुंज झाली या झुंजीत एक लाख मराठे शहीद झाले होते. यात अठरापगड जाती मधील महाराष्ट्रातल्या जनतेचे वंशज धारातीर्थी पडले होते. या घटनेला 14 जानेवारी 2020 ला 260 वर्षे पूर्ण होत आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या पूर्वजांच्या स्मृती जागवण्यासाठी नाशिकच्या 'टीम पाणिपत' या ग्रुपने पानिपत ते नाशिक असा साडेचौदाशे किलोमीटरचा प्रवास करण्याचे ठरवले आहे यासाठी नाशिकचे छत्तीस सायकलपटू रोज 30 ते 40 किलोमीटर चा सराव करीत आहे.

(VIDEO - हर्षवर्धन बोऱ्हाडे)

कालाआम ते काळाराम सायकल प्रवास

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा मराठी माणसाच्या काळजाला हेलावणारा आहे. म्हणून पानिपत येथे धारातीर्थी पडलेल्या मराठी सैनिकांचे स्मृती स्थळ असणारे कालाआम उद्यानापासून ते नाशिक च्या काळाराम या ऐतिहासिक मंदिरापर्यंत नाशिकचे इतिहास प्रेमी सायकलपटू सायकलवर प्रवास करणार आहे

आम्ही जिंकूनच येणार...1450 किमी अंतर कापणार

14 जानेवारी ला दुपारी बारा वाजता काला आम स्मृति उद्यानापासून नाशिक कडे प्रवास सुरू होणार असून रोज सरासरी 160 ते 180 किलोमीटरचा प्रवास सायकलपटू करणार आहे. यात पानिपत पासून निघून दिल्ली - कोटपूतली(राजस्थान)- दुदु- नीमच(मध्य प्र.)- रतलाम- धारमार्गे धामनोद -धुळे -नाशिक(काळाराम मंदिर) असा प्रवास असणार आहे. यासाठी 13 जानेवारीला हे सर्व सायकलपटू रेल्वेने पानिपत येथे सायकल घेऊन दाखल होणार आहे. पानिपतच्या युद्धात मराठे हरले होते मात्र आम्ही जिंकून येत आहोत असाच संदेश या सायकल मोहिमेतून दिला जाणार आहे.

हेही वाचा > राष्ट्रवादी काँग्रेस एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकला - छगन भुजबळ

रामकुंडावरील पाणी(कलश) रेल्वेने पानिपला घेऊन जाणार

'या मोहिमेत आम्ही रामशेज किल्ल्यावर ची माती आणि नाशिकच्या रामकुंडावरील पाणी(कलश) रेल्वेने पानिपत येथे घेऊन जाणार आहोत .माती व पाण्याचे विसर्जन पानिपत येथील कालाआम उद्यानात करणार असून शूरांच्या स्मृतींना नतमस्तक होऊन आम्ही आमचा सायकल प्रवास सुरु करणार आहोत। यासाठी आम्हाला निरनिराळ्या व्यक्ती संघटना आणि संस्थांचा पाठिंबा मिळात आहे. - डॉ आबा पाटील, आयोजक

हेही वाचा > संशयिताला पकडताना झाली झटापट...त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचेच मात्र....

हेही वाचा > रात्रीचा 'तिचा' प्रवास...उद्यानात दारूच्या पार्ट्या रंगताना 'ते' तिला बघतात..अन् मग....​