Dhule News : वादळाने मोडलेला खांब झाडावर खातोय हेलकावे; वीज कंपनीचे दुर्लक्ष

Kapdane: A power pole broken by a storm is taking its toll on an acacia tree.
Kapdane: A power pole broken by a storm is taking its toll on an acacia tree.esakal

Dhule News : जिल्ह्यात ४ जूनला मोठे वादळ आले. सकाळी आठलाच मोठी धावाधाव झाली. वादळाने मोठे नुकसान केले. येथील जोगाईमाता मंदिर परिसरातील आणि भात नदीपात्रात असलेला विजेचा खांब मोडला.

तो बाभळीवर उभ्या अवस्थेत कोलमडला आहे. या भागातील वीजपुरवठा आठ दिवसांपासून बंद आहे. वीज वितरण कंपनीला वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत आहे. या भागातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. (pillar broken by storm is on the tree neglect of electricity company Jogai Mata temple premises in darkness Dhule News)

तो शेतकरी त्रासला

भात नदीपात्रातील विजेचा खांब वादळामुळे मोडला आहे. तो बाभळीच्या झाडावर उभ्या अवस्थेत लटकला आहे. एका खळ्यातील नाना पाटील या शेतकऱ्याची गैरसोय झाली आहे. तिथे गुरे बांधणे जिकिरीचे झाले आहे. या शेतकऱ्याने वारंवार सांगूनही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. जीव मुठीत घेऊन हा शेतकरी व गुरे या खळ्यात वावरत आहेत.

तेरा कुळांची कुलदेवताही अंधारात

जोगाई माता मंदिर परिसरातील वीज आठ दिवसांपासून बंद आहे. बत्तीगुल झाल्याने आठ दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुलस्वामिनी जोगाई माता तेरा कुळांची कुलदेवता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kapdane: A power pole broken by a storm is taking its toll on an acacia tree.
Dhule News : झाड कोसळून शिक्षकाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर

खानदेशासह नाशिक व सुरतमधून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर आणि सभामंडपात पंखे आणि वातानुकूलित व्यवस्था आहे. हे सारे आठ दिवसांपासून बंद पडले आहे. भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रात्री मंदिर परिसर अंधारात लुप्त झालाय.

दरम्यान, तत्काळ विजेचा खांब बसवावा, अशी अपेक्षा जोगाईमाता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, माजी अध्यक्ष पी. बी. पाटील, रमेश पाटील, पांडुरंग पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, नाना पाटील आदींनी केली आहे.

Kapdane: A power pole broken by a storm is taking its toll on an acacia tree.
Dhule News : नगाव जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात 2 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार : राम भदाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com