Dhule News: महापौरपदावरून केलेल्या कामामुळे समाधानी : प्रतिभा चौधरी

महापौर म्हणून काम करण्यास केवळ दहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. यात अनेक प्रभावी कामे करतानाच गैरव्यवहार रोखण्याच्या कामकाजावर भर दिला.
Pratibha Chaudhary
Pratibha Chaudhary esakal

Dhule News : महापौर म्हणून काम करण्यास केवळ दहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. यात अनेक प्रभावी कामे करतानाच गैरव्यवहार रोखण्याच्या कामकाजावर भर दिला. या कालावधीत केलेल्या कामाबाबत समाधानी आहे.

पक्षीय वरिष्ठ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे माझा कार्यकाळ धुळेकरांच्या स्मरणात राहील, असे स्पष्टीकरण प्रतिभा चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.(Pratibha Chaudhary statement of Satisfied with work done as Mayor Dhule News)

महापालिकेची डिसेंबर २०१८ मध्ये निवडणूक झाली. तीत भाजपने एकहाती सत्ता मिळविली. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ डिसेंबरअखेर संपुष्टात आला. सौ. चौधरी म्हणाल्या, की महापौरपदासाठी केवळ दहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला.

पूर्ण अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळाला असता तर अधिक चांगले काम करता आले असते; परंतु अल्पावधीत प्रभावी काम करण्याचा प्रयत्न केला. घरपट्टीवाढीचा विषय जटिल आहे. महापालिका प्रशासनाने २०१५ नंतर मालमत्ता करवाढीची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे आता ही करवाढ मोठी वाटते आहे.

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न

उत्पन्नवाढीसाठी साक्री रोडला महापालिका प्रशासनाला पेट्रोलपंप चालविता यावा यासाठी प्रयत्न केले. साक्री रोडची शाळा क्रमांक १४ जवळची जागा या पेट्रोलपंपासाठी प्रस्तावित करण्यात आली. शहरात सुमारे दोनशेपेक्षा जास्त महापालिकेच्या जागा असून, त्या नाममात्र भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत.

मुदत संपलेल्या सर्व जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात. शाहू नाट्यमंदिरही महापालिकेने ताब्यात घ्यावे, यासाठी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. स्वच्छता, कचरा संकलनातील ठेकेदार संस्थेने महापालिकेची फसवणूक केली. संबंधितांवर कारवाईबाबत प्रशासनाने पत्रव्यवहार केला. कोणतेही चुकीचे काम किंवा भ्रष्टाचार माझ्याकडून झाला नाही.

Pratibha Chaudhary
Nashik News: ‘सही रे सही’ची नोंद गीनिज बूकमध्ये व्हावी : नितीन गडकरी

गैरव्यवहाराचे षडयंत्र

गैरव्यवहारातून महापालिकेला लुटण्याचे षडयंत्र हाणून पाडले. महापालिकेसह धुळेकरांच्या पैशावर पाच ते सात वर्षांपासून दरोडा टाकणाऱ्या आस्था संस्थेचे पितळ उघडे पाडले. हा वादग्रस्त ठेका रद्द केला. देवपूरमधील भाजी मंडईची जागा गडप करणाऱ्या भूमाफियांना दणका दिला.

मानधनावरील लिपिक, टंकलेखकांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी पदनिर्मितीचा प्रस्ताव, शहर सुशोभीकरणासाठी प्रयत्न करताना पांझरा नदीकाठी अत्याधुनिक बगिच्याची निर्मिती केल्याचे समाधान आहे.

प्रस्तावांसाठी पुढाकार

महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मोठ्या प्रमाणात पदेही रिक्त आहेत. भरती प्रक्रियेला स्थगिती आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुराव्यातून मनपातील १२६ पदे भरतीबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. हद्दवाढ क्षेत्रासाठी नवीन विकास आराखडा तयार करून गावांना सिटी सर्व्हे लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.

देवपूर भागासाठी नवीन अग्निशमन केंद्र उभारणी प्रस्ताव, देवपूरमधील अमरधाममध्ये वीजदाहिनीसाठी प्रयत्न, शहरात ई-बससेवा प्रकल्प कार्यान्वित करणे, एनयूएचएमअंतर्गत कृष्णनगर व हजार खोली भागात नवीन दवाखानानिर्मिती प्रस्ताव, मिल परिसर आणि शहरातील अतिक्रमित जागांवरील निवासी घरांना सिटी सर्व्हे लागू करणे.

Pratibha Chaudhary
Dhule News: धगधगत्या ‘हॉकर्स झोन’ मध्ये प्रशासकांची उडी! पांझरा नदीकिनारी रस्त्यावर व्यवसाय थाटण्याचा फतवा

गुंठेवारी प्रस्ताव कार्यान्वित करण्यास मान्यता, माजी सैनिकांप्रमाणेच अर्धसैनिक बलाच्या जवानांना मालमत्ता करात माफी देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आल्याचे सौ. चौधरी यांनी नमूद केले. भाजपच्या सभागृहनेत्या भारती माळी, स्थायी समितीचे माजी सभापती सुनील बैसाणे उपस्थित होते.

विकासकामांचा समावेश

पाचकंदील मार्केट आणि दसेरा मैदान येथे व्यापारी संकुल बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता, पाचकंदील येथील विकासकाने दाखल केलेल्या नुकसानभरपाई दाव्याबाबत प्रतिदावा दाखल करण्याची कार्यवाही, आर. आर. पाटील व्यापारी संकुल आणि छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचे थकीत भाडे आणि मालमत्ता कर आकारणीची कार्यवाही.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रेशर मीटर व आराखडा तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती, मनोरंजनासाठी पांझरा चौपाटी येथे अत्याधुनिक बगिच्याची निर्मिती आदी कार्यकाळातील विकासकामांचा समावेश असल्याचे सौ. चौधरी यांनी नमूद केले.

Pratibha Chaudhary
Dhule News: दंडात्मक चलनावर धुळ्यातून हरकत; ट्रक-मालक संघटनेचे विधी सेवा प्राधिकरणाला निवेदन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com