Dhule News : तेली समाजातर्फे निषेध आंदोलन; राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला ‘जोडा मार’

Protesters of Teli community protest against the symbolic statue of MP Rahul Gandhi on
Protesters of Teli community protest against the symbolic statue of MP Rahul Gandhi onesakal

धुळे : तेली समाजातर्फे शहरातील संताजी महाराज स्मारकाजवळ शुक्रवारी (ता. २४) काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडा मार आंदोलनातून निषेध आंदोलन करण्यात आले. (protest movement and joda maar movement against symbolic statue of Rahul Gandhi by teli community dhule news)

खासदार गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खासदार गांधी तेली समाजाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

निवेदनाचा आशय असा ः तेली समाजाला अर्वाच्य भाषेत चोर म्हणून अपमानित करणाऱ्या खासदार गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. असे असूनही न्यायालयाची व तेली समाज, मोदी समाजाची माफी मागण्याऐवजी समर्थक हे खासदार गांधी यांना हीरो करण्याच्या प्रयत्नात आहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Protesters of Teli community protest against the symbolic statue of MP Rahul Gandhi on
Abhay Yojana : थकबाकीदारांची नावे चौकाचौकांत लावू...महापालिका प्रशासनाचा इशारा!

जणू न्यायालयाने त्यांच्यावर फार मोठा अन्याय केला. त्यांनी तेली समाज व ओबीसी समाजाला अपमानित करून कुठलीही चूक केली नाही, अशा आविर्भावात ते बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तेली समाजाला अपमानित करण्याचे काम खासदार गांधी यांच्याकडून झाले आहे.

आजही काँग्रेसचे नेते समाजाला अपमानित करीत असल्याचे निवेदन समाजातर्फे महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, कैलास चौधरी, दिनेश बागूल, नगरसेवक नरेंद्र चौधरी, मनोज चौधरी, कल्पना चौधरी, रिटा बागूल, कविता अहिरराव, रूपाली महाले, प्रियंका चौधरी, भारती अहिरराव, आशा चौधरी, कैलास बोरसे, श्यामकांत ईशी आदींनी जिल्हा प्रशासनाला दिले.

Protesters of Teli community protest against the symbolic statue of MP Rahul Gandhi on
Dhule Crime News : वाहने लुटणारी टोळी गजाआड; धुळे एलसीबीची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com