नंदुरबार : पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याच्या सूचना : आमदार डॉ. विजयकुमार गावित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandurbar

पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याच्या सूचना : आमदार डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : तालुक्यातील एकाही गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, त्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी आज अधिकारी व ग्रामसेवकांच्या बैठकित दिल्या.

नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील गावांमधील संभाव्य पाणी टंचाई आणि त्यावरील उपाय योजना संदर्भात आढावा घेण्यासाठी आज पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. या बैठकीस पंचायत समिती सभापती प्रकाश गावित, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सहाय्यक गटविकास अधिकारी सुवर्णा पवार, सदस्य दीपक पाटील, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.

आमदार डॉ. गावित म्हणाले , गावातील सर्वेक्षण करणे गरजेचे असून घनकचरा व्यवस्थापनासह पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे काम करायचे आहे. प्रशासनासह सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि ग्रामस्थ सर्वांनी सामूहिकरीत्या ही जबाबदारी पेलण्याची आवश्यकता आहे. सर्वेक्षण दरम्यान गावातील खुले प्लॉट किंवा बांधकाम सुरू असलेल्या जागांवर सुद्धा पाणी पुरवठा संदर्भात उपाययोजना करण्यात यावी. इतर राज्याप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या कामावर यंत्राद्वारे कामकाज करण्यात येते. त्यानुसार आपल्या भागात देखील प्रयोग करण्यास हरकत नसल्याचे आमदार डॉ. गावित यांनी सांगितले.

हेही वाचा: Nandurbar : आयान कारखान्याच्या आगीत 11 कोटीची मळी खाक

पाणी टंचाई आढावा बैठकीत संदर्भात माहिती देण्यासाठी पाणीपुरवठा अभियंता, तालुक्यातील प्रत्येक गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आवर्जून उपस्थित होते. यावेळी आमदार विजयकुमार गावित यांनी गावनिहाय संभाव्य पाणी टंचाई संदर्भात प्रत्येक ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी व्यक्तिगत संवाद साधून माहिती जाणून घेतली.

हेही वाचा: Nandurbar : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास 7 वर्ष सश्रम कारावास

पाणी टंचाईच्या बैठकीत सारेच झाले चिंब

पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठक सुरू असताना तब्बल दीड तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी संताप व्यक्त करीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बैठकीला उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, ग्रामसेवक यांना बसणेही जिकरीचे झाले होते. एवढा उकाडा होत होता. अक्षरशः घामाचा धारांनी सारेच जण चिंब झाले होते.

Web Title: Suggestions For Solution Water Scarcity Mla Dr Vijaykumar Gavit In Nandurbar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top