esakal | #OnionPrice : तुर्की, इजिप्तच्या कांद्याला महाराष्ट्राच्या कांद्याची धोबीपछाड 
sakal

बोलून बातमी शोधा

onion market.jpg

कर्नाटकमधील स्थानिक कांद्याच्या भावात बेंगळुरूमध्ये क्विंटलमागे एक हजार रुपयाची वृद्धी झाली. तसेच देशामध्ये चेन्नईत सर्वाधिक बारा हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. दिल्लीत दोन दिवसांच्या तुलनेत आज क्विंटलमागे दीडशे रुपयाची वाढ होऊन कांद्याची दहा हजारांनी विक्री झाली. सोलापूरमध्ये दहा हजार, पुण्यात साडेसात, मुंबईत आठ हजार रुपये क्विंटल हा भाव स्थिर राहिला. कोल्हापूरला क्विंटलमागे 850 रुपयांची वाढ होत साडेआठ हजार रुपये भाव निघाला. नागपूरमध्ये साडेसात हजार रुपये भाव निघाला असून, भावात दोन दिवसांत पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. जळगावमध्ये क्विंटलमागे साडेसातशे रुपये अधिकचा भाव शेतकऱ्यांना मिळाला असून, आज येथे साडेसहा हजार रुपये असा भाव निघाला. 

#OnionPrice : तुर्की, इजिप्तच्या कांद्याला महाराष्ट्राच्या कांद्याची धोबीपछाड 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बेंगळुरूमध्ये तुर्कस्थान अन्‌ इजिप्तपेक्षा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानच्या कांद्याच्या भावाची "लाली' सोमवारी (ता.23) अधिक राहिली. क्विंटलला तुर्कस्थानच्या कांद्याला सात हजार, तर इजिप्तच्या कांद्याला साडेसहा हजारांचा भाव मिळाला. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानच्या कांद्याला नऊ हजारांचा भाव मिळाला. कर्नाटकमधील स्थानिक कांद्याचा भाव नऊ हजार एवढा राहिला. राज्यात सर्वाधिक 11 हजार रुपये क्विंटल भावाने इंदापूरमध्ये कांदा विकला गेला. 

बेंगळुरात अडीच हजारांचा जादा भाव; इंदापूरमध्ये क्विंटलला 11 हजार 

कर्नाटकमधील स्थानिक कांद्याच्या भावात बेंगळुरूमध्ये क्विंटलमागे एक हजार रुपयाची वृद्धी झाली. तसेच देशामध्ये चेन्नईत सर्वाधिक बारा हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. दिल्लीत दोन दिवसांच्या तुलनेत आज क्विंटलमागे दीडशे रुपयाची वाढ होऊन कांद्याची दहा हजारांनी विक्री झाली. सोलापूरमध्ये दहा हजार, पुण्यात साडेसात, मुंबईत आठ हजार रुपये क्विंटल हा भाव स्थिर राहिला. कोल्हापूरला क्विंटलमागे 850 रुपयांची वाढ होत साडेआठ हजार रुपये भाव निघाला. नागपूरमध्ये साडेसात हजार रुपये भाव निघाला असून, भावात दोन दिवसांत पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. जळगावमध्ये क्विंटलमागे साडेसातशे रुपये अधिकचा भाव शेतकऱ्यांना मिळाला असून, आज येथे साडेसहा हजार रुपये असा भाव निघाला. 
 
हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण.. 
 
लासलगावमध्ये नऊशेंची वाढ 
कांद्याचे आगार असलेल्या लासलगावमध्ये दोन दिवसांत कांद्याच्या भावात क्विंटलमागे 900 रुपयांची वाढ होऊन आज आठ हजार 301 रुपये असा भाव मिळाला. पिंपळगावमध्ये 112 रुपयांची वाढ होऊन कांदा सात हजार 513 रुपये क्विंटल भावाने विकला. कोलकोत्यात मात्र साडेसातशे, तर पाटण्यात पाचशे रुपयांनी घसरण झाली. कोलकोत्यात क्विंटलभर कांद्याला आठ हजार 750 आणि पाटण्यात साडेआठ हजार रुपये भाव मिळाला. औरंगाबादमध्ये तीनशे रुपयांनी भाव घटले. आज इथे साडेसहा हजार रुपयांचा भाव होता. सांगलीत साडेनऊ हजार, धुळ्यात सहा हजार 800, देवळ्यात सात हजार 800 रुपये क्विंटल भाव होता. 

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

हेही वाचा > पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय?