Unseasonal Rain Crop Damage : हतनूर, भडणे, साळवेत अवकाळीने पुन्हा झोडपले

Unseasonal Rain Crop Damage
Unseasonal Rain Crop Damageesakal

Dhule News : हतनूर, भडणे व साळवे शिवारात (ता. शिंदखेडा) गुरुवारी (ता. ६) पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. जोरदार वाऱ्यासह चिंचोक्यांच्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारांमुळे बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. (unseasonal rain crop damage Horticultural crops were severely damaged by hailstorm dhule news)

गेल्या महिन्यात ५ मार्चला अवकाळी पाऊस बरसला होता. आता पुन्हा महिनाभरात दुसऱ्यांदा जोरकस अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. सातत्याच्या नुकसानीने मेहनतीवर पाणी फिरले आहे. सरकारकडून कोणतीही मदत होत नसल्याने संतापही व्यक्त होत आहे.

रब्बीचे नुकसान

हतनूर, भडणे व साळवे परिसरात गेल्या ५ मार्चला मुसळधार अवकाळी पाऊस झाला होता. त्या वेळी काढणीला आलेल्या मका, गहू, हरभरा व ज्वारीचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा बरोबर महिनाभरात अवकाळीने हजेरी लावली आहे. चिंचोक्यांच्या आकाराच्या गारा बरसल्याने पुन्हा रब्बीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Unseasonal Rain Crop Damage
Nashik Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ZP आरोग्य विभाग सज्ज!

कांद्याचे नुकसान

परिसरातील काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांद्यावर शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा आशा अवलंबून असतात. शासनही हमीभाव देत नाही अन् अवकाळीही जगू देत नसल्याने अस्मानीबरोबर सुलतानी संकटात शेतकरी राजा सापडला आहे. नुकसानभरपाईची मागणी पोलिसपाटील तथा युवा शेतकरी युवराज माळी यांनी केली आहे.

कापडणेत परिसरातही हजेरी

सायंकाळी सातला आकाश अचानक भरून आले अन् दहा मिनिटे तुरळक सरी कोसळत होत्या. परिसरात ज्वारी व मक्यासह कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Unseasonal Rain Crop Damage
Dhule News : एप्रिलमध्येच टॅंकर, कुठे गेला तुमचा दावा? अक्कलपाडाच्या दाव्यांवर साशंकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com