Latest Marathi News | पांझरा चौपाटीवर गांजासह तरुण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deputy Superintendent of Police S. Hrishikesh Reddy and team

Dhule News : पांझरा चौपाटीवर गांजासह तरुण ताब्यात

धुळे : शहरातील पांझरा नदी चौपाटी परिसरात पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) छापा टाकून दहा किलो गांजासह संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शहरातील देवपूर भागातील पांझरा चौपाटी परिसरात दोन जण गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक श्री. रेड्डी यांना मिळाली.

त्यानुसार श्री. रेड्डी आणि देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, राजेंद्र माळी, रोहिणी जाधव, मिलिंद सोनवणे, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, योगेश कचवे यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. ६) दुपारी पांझरा चौपाटी भागात छापा घातला. एका संशयिताला मुद्देमालासह पकडले. (Youth arrested with ganja at Panjra Chowpatty Deputy Superintendent of Police Reddy's team action Dhule News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : 4 उपनद्यांसह 67 नाल्यांना पुनर्वैभव! मुंबई IITचा मिठी नदीच्या धर्तीवर प्रकल्प

त्याचा साथीदार मात्र पसार झाला. दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथून हे दोघे संशयित दहा किलो गांजा घेऊन धुळ्यात आले. सूर्यकांत दिलीप तमईचेकर असे पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी राज्य उत्पादन शुल्क, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. गांजा बाळगणाऱ्या तरुणाकडे गांजा कुणी दिला, तो कुठून आला, कुठे दिला जाणार होता, या व्यवहारात कोण-कोण आहेत याची माहिती पोलिस घेत आहेत.

पांझरा चौपाटीवर सध्या अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी ताबा मिळविला आहे. या ठिकाणी प्रतिबंधित गुटखा, दारू, भांग, गांजा यांसारख्या अमली पदार्थांची विक्री व सेवन होत असल्याचे सांगितले जाते. अशाच प्रकारे चौपाटीवर फिरणाऱ्यांपैकी एकाकडे गांजा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दोन बॅगांमध्ये हा गांजा होता.

हेही वाचा: Nashik News : आजोबा-वडिलांचा खून करणाऱ्या दोघा भावांना जन्मठेप