Dhule News : जेव्हा ZP शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना अंघोळ घालतात..!

नीटनेटकेपणा अन् स्वच्छतेचा कृतीतून संदेश
Teacher Patil bathing the son of a sugarcane worker with soap
Teacher Patil bathing the son of a sugarcane worker with soapesakal

कापडणे (जि. धुळे) : जिल्हा परिषद शाळांच्या मुल्य शिक्षणात संस्कार, वेळ, आरोग्य, नियमितपणा, स्वच्छता, निटनेटकेपणा आदी दहा मुल्य आहेत. पण ही मुल्य स्वतः शिक्षक किती पाळतात हा संशोधनाचा अन वादविवादाचा विषय होवू शकेल. आजही शाळेत बर्‍याचशा गोरगरीबांची मुले स्वच्छता आणि निटनेटकेपणाच्या बाबतीत कोसो दूर आहेत.

आईवडिल दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी भटंकती करतात. तेव्हा लेकरांची हेळसांडच होते. जिल्हा परीषद शाळेतील एका शिक्षकाने चक्क या मुलांची आंघोळच घालण्याचा उपक्रम सुरु केला आहे. स्वतः साबण लावून आंघोळ घालण्याच्या या उपक्रमाने या शिक्षकावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. (ZP School Teachers manojkumar patil Bath Students Dhule News)

वाघोदा (ता.शिंदखेडा) येथील जिल्हा परीषद शाळेचा युवा शिक्षक मनोजकुमार पाटील हे जिल्ह्यात उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांचा विद्यार्थी केंद्रीभूत मानून केलेला प्रत्येक अनुकरणीय अन शिक्षण क्षेत्रात चर्चेचा ठरत असतो. शासकीय परीपत्रकानुसार सर्वच उपक्रम राबविण्यात ते माहिर आहेत. त्यांनी विद्यार्थी आंघोळीचा सुरु केलेला उपक्रमाला सोशल मिडीयावर मोठी दाद मिळत आहे.

शिक्षक पाटील यांनी सांगितले, परीपाठाच्या तासाला स्वच्छता व निटनेटकेपणामुळे आरोग्य लाभते. असे आपण सांगतो. पण काही विद्यार्थी आजही स्वच्छतेपासून लांब आहेत. त्यांना आंघोळीची सवय लावण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे.

यासाठी दुसरीतील कार्तिक भिल हा विद्यार्थी प्रेरणादायी ठरला. तो ऊसतोड कामकारांचा स्थलांतरीत विद्यार्थी आहे. त्याच्या अंगावरचा मळ बघून अस्वस्थ वाटायचे. अन शाळेत त्याच्यासाठी साबण आणला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Teacher Patil bathing the son of a sugarcane worker with soap
भीक मागणाऱ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत; Mahavitaran अभियंत्याकडून वर्धा येथील संस्थेला 31 हजारांची देणगी

अन स्वतःच त्याची आंघोळ घालण्यास सुरूवात केली आहे. शरीरावरचा मळ घालविणार आहे. इतरांना शास्र्तशुध्द आंघोळीची सवय लावणार आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी उपक्रम अविरत सुरु राहिल.

दरम्यान पाटील यांनी वाघोदेतील शाळा आदर्शवत केली आहे. ते विद्यार्थ्यांसाठी शाॅर्ट फिल्म बनवित असतात. स्वखर्चाने बरेचसे शैक्षणिक साहित्य तयार करीत असतात. टाकावूपासून टिकावू बनवितात.

"कार्तिकच्या अंगावरचा मळ मला स्वस्थ बसू देत नव्ह्ता. मी सलग किमान पंधरा दिवस अंघोळ घालणार आहे. त्याला अंघोळ कशी करायची याचे प्रशिक्षणही इतर विद्यार्थ्यांना देत आहे. शाळा माझे मंदिर आहे. विद्यार्थी हा माझा देव आहे. मी त्याचा पुजारी आहे. विद्यार्थ्यांसाठीच जगणे हा माझा धर्म आहे." - मनोजकुमार पाटील, शिक्षक जि.प.शाळा वाघोदे

Teacher Patil bathing the son of a sugarcane worker with soap
Jai Jai Maharashtra Majha : 19 फेब्रुवारीपासून राज्यात राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा..' गायलं जाणार...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com