नागपूर झोनमध्ये चार केंद्रांवर कापसाची खरेदी, सर्वोत्तम कापसाचा दर ५८२५ रुपये

विजयकुमार राऊत
Sunday, 6 December 2020

कापूस पणन महासंघाच्या नागपूर झोनमध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. दोन्ही जिल्ह्यात कापसाचे विक्रमी उत्पादन होते. यावर्षी पणन महासंघाने नागपूर जिल्ह्यात सावनेर व काटोल तर वर्धा जिल्ह्यात आर्वी व तळेगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे.

हिंगणा (जि. नागपूर ) :  कापूस पणन महासंघाने नागपूर झोनमध्येमध्ये चार कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर आत्तापर्यंत ४४८ शेतकऱ्यांकडून १०,०११ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. उत्तम प्रतवारी असलेल्या कापसाला प्रती क्विंटल ५,८२५ रूपे दर दिला जात आहे. 

हेही वाचा - ८० टक्के शाळा सुरूच, पण उपस्थिती मात्र २१ टक्केच

कापूस पणन महासंघाच्या नागपूर झोनमध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. दोन्ही जिल्ह्यात कापसाचे विक्रमी उत्पादन होते. यावर्षी पणन महासंघाने नागपूर जिल्ह्यात सावनेर व काटोल तर वर्धा जिल्ह्यात आर्वी व तळेगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी गर्दी होत आहे. कापसाची आवकही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. 

हेही वाचा - २०२१च्या सर्वाधिक सुट्ट्या शुक्रवारलाच; तर दोन रविवारी...

तत्कालीन भाजप सरकारने नागपूर जिल्ह्यातील कामठी, हिंगणा, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, उमरेड, भिवापूर, कुही, बुट्टीबोरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. त्यावेळी पणन महासंघाच्या मदतीला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाचे खरेदी केंद्र सुरू झाले होते. पणन महासंघाकडे तोकडी कर्मचारी संख्या असल्याने नागपूर झोनमध्ये केवळ चारच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कापसाच्या विक्रीसाठी जाताना शेतकऱ्यांना टोकन घ्यावे लागते. यानंतर शेतकऱ्यांच्या गाड्या खरेदी केंद्रावर दाखल होतात. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या पाहता नागपूर जिल्ह्यात सुरू झालेले दोन केंद्र शेतकऱ्यांना अपुरे पडणार का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कापसाची प्रतवारी पाहून दर ठरविल्या जात आहे. ५,७२५ ते ५,८२५ हा क्विंटल मागे दर दिल्या जात आहे. 

हेही वाचा - विजय वडेट्टीवार यांच ‘एक तीर दो निशान’; उदयनराजेंच्या निमित्ताने फडणवीसांना हाणला टोला

नागपूर जिल्ह्यातील इतर अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी सावनेर किंवा काटोल या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर जावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी ससेहोलपट तर होणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कापूस पणन महासंघाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट पाहता इतर ठिकाणी ही कापूस खरेदी विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जोर धरू लागली आहे. 

हेही वाचा - नागपूरवरून वर्धेत गेल्यानंतर युवकाने घेतले विष; नंतर घेतली नदीत उडी

कापूस पणन महासंघाने नागपूर विभागात चार खरेदी केंद्र सुरू केले आहे. कापसाची प्रतवारी पाहून दर ठरवल्या जात आहे. यावर्षी गुलाबी बोंड अळी आल्याने कापसाच्या प्रतवारीत घसरण झाल्याचे दिसून येत आहे. पणन महासंघाचे अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन कर्मचारी भरती झाली नाही. यामुळे कापूस खरेदी केंद्र सुरू करताना मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. सहकार विभागाकडून आदेश आल्यास नवीन कापूस खरेदी केंद्र सुरू करता येणे शक्य आहे. कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याची दक्षता पणन महासंघ घेत आहे. 
- प्रकाश बावरे (विभागीय व्यवस्थापक), कापूस पणन महासंघ, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cotton selling on four center in hingna of nagpur